शासनाने ठरवून दिलेल्या दवाखान्यात मोफत उपचार मिळणार : डॉ.गुंजाळ

नायक वृत्तसेवा, आश्वी
आयुषमान व वय वंदना कार्ड हे दोन्ही कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत देण्यात येतात.हे कार्ड काढण्यासाठी कुठलेही पैसे घेण्यात येत नाहीत. हे पुर्णपणे मोफत आहे. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या दवाखान्यामध्ये पिवळे, केशरी, पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येतात. अशी माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. अतुल गुंजाळ यांनी दिली.

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे महात्मा फुले जन आरोग्य योजना तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या आयुषमान व वयवंदना कार्ड लाभार्थीचा मेळावापार पडला त्यावेळी डॉ.अतुल गुंजाळ बोलत होते.ते पुढे म्हणाले की, आयुष्मान भारत वय वंदना कार्ड ७० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे, त्यांची आर्थिक स्थिती काही ही असो. त्यांच्यावर तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील शासनाने नियुक्त केलेल्या दवाखान्यात मोफत उपचार केले जाणार आहेत.

आयुषमान व वय वंदना कार्ड हे दोन्ही कार्ड प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत येत असून आयुष्यमान आरोग्य कार्ड मध्ये पिवळे,केसरी तसेच पांढरे तसेच इतर पात्र रेशन कार्ड धारकांना प्रत्येक कुंटुबास पाच लाख रुपयांचे विमा कवच मिळते अशी जिल्हा प्रमुख डॉ. प्रियंका गोडगे यांनी माहीती दिली.यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रविण इल्हे, सरपंच अलका गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, भाजपा आश्वी मंडल सरचिटणीस मोहित गायकवाड, कैलास गायकवाड, आरोग्य मित्र दिपक दातीर, गणेश पावबाके, आशा सेविका गट प्रवर्तक मंगल जोशी, आशा सेविका सुनिता मुटगुडे, कडु तक्ते, छाया फुगे आदींसह योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतुन ग्रामिण भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहु नयेत यासाठी गाव खेड्यामध्ये विशेष शिबिराचे आयोजन करून पात्र लाभार्थ्यांसाठी आयुष्यमान व वयवंदना कार्ड काढण्यासाठी आश्वी खुर्द ग्रामपंचायत येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती मोहित गायकवाड यांनी दिली.

Visits: 162 Today: 2 Total: 1114870
