‘महानंद’च्या अडचणीच्या काळात रणजीतसिंह देशमुखांचे काम दिशादर्शक ः आ.डॉ.तांबे

‘महानंद’च्या अडचणीच्या काळात रणजीतसिंह देशमुखांचे काम दिशादर्शक ः आ.डॉ.तांबे
देवगड येथे विविध संस्थांच्यावतीने वृक्षारोपण, सॅनिटायझर व मास्क वाटप
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोनाच्या महामारीत दूध व्यवसाय अडचणीत आला असताना महाविकास आघाडीकडे सातत्याने पाठपुरावा करून अतिरिक्त दहा लाख दूधाची पावडर बनविण्यासाठी पाठपुरावा करून दूध उत्पादकांना दिलासा देणारे रणजीतसिंह देशमुख यांचे अडचणीच्या काळात महानंदमध्ये दिशादर्शक काम ठरले असल्याचे गौरवोद्गार नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी काढले आहे.

संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा (देवगड) येथे राजहंस दूध संघ, अश्वप्रेमी असोसिएशन संगमनेर व शिवराज्य नवनिर्माण संघटनेच्यावतीने रणजीतसिंह देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित वृक्षारोपण, सॅनिटायझर व मास्कचे वितरण आणि कोरोना योद्ध्यांचा सत्कार कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते बाजीराव खेमनर हे होते. तर व्यासपीठावर लक्ष्मण कुटे, आर. बी. रहाणे, साहेबराव गडाख, संतोष हासे, विलास कवडे, मोहन करंजकर, पांडुरंग सागर, बाबासाहेब गायकर, संतोष मांडेकर, माणिक यादव, उत्तम जाधव, मीनानाथ वर्पे, अण्णासाहेब राहिंज, कैलास पानसरे, भाऊसाहेब जाधव, राजेंद्र देशमुख, योगेश सोनवणे, विलास शिंदे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार डॉ.तांबे यांच्या हस्ते देवगड प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कोरोना संकटात चांगले काम केल्याबद्दल डॉ.संदीप कचेरिया व सतीश बुरंगुळे यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, कोरोना हे मानवजातीवरील संकट आहे. कोणीही कोरोनाबाबत निष्काळजीपणा करू नये. प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य आहे. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत कोरोनाची काळजी घेतली पाहिजे. भावनांपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. कोरोना संकटात दूध उत्पादकांना दिलासा देताना रणजीतसिंह देशमुख यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने पाठपुरावा करून महाविकास आघाडी सरकारकडून दहा लाख अतिरिक्त झालेले दूध पावडर करण्यासाठी धाडसी निर्णय घेतला. यामुळे दूध बंद ऐवजी शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला. तसेच देवगड यात्रेमध्ये अश्व बाजार व अश्व प्रदर्शन आयोजित करून या देवगडचा राज्यात लौकिक निर्माण केला आहे. प्रास्ताविक मोहन करंजकर यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ.प्रमोद पावसे यांनी केले. शेवटी विलास कवडे यांनी आभार मानले. यावेळी परिसरातील कार्यकर्ते, नागरिक व देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Visits: 18 Today: 1 Total: 117816

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *