वीरभद्र महाराजांना चांदीचा मुकूट अर्पण

वीरभद्र महाराजांना चांदीचा मुकूट अर्पण
नायक वृत्तसेवा, राहाता
येथील ग्रामदैवत वीरभद्र महाराजांच्या मंदिरातील वीरभद्र महाराज, भगवान शंकर व पार्वती यांचे चांदीचे मुखवटे मागील महिन्यात अज्ञात चोरट्याने चोरून नेले होते. परंतु पोलिसांनी आपले कौशल्य पणाला लावत काही दिवसांतच चोरास पकडले. त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करून नुकताच मंदीर व्यवस्थापनाकडे सुपूर्द केला असून महाराजांना ‘पुन्हा’ चांदीचा मुकूट अर्पण करण्यात आला आहे.

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रामस्थ व काही व्यापार्‍यांनी एकत्र येत वीरभद्र महाराज, भगवान शंकर व पार्वती यांचे मुकूट रुद्राभिषेक व विधीवत पूजा करून अर्पण करण्यात आले. तसेच सहा किलो चांदी दान स्वरूपात मिळाली असून टोप, पादुका व दीड किलो चांदीचे दागिने वीरभद्र देवस्थानने घेतले आहे. तर 3 लाख 75 हजार रुपये हे देणगी स्वरूपात प्राप्त झाले असल्याचे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले. यावेळी प्रातिनिधीक स्वरुपात देणगीदारांचा वीरभद्र देवस्थान तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामस्थ, देणगीदार, देवस्थानचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त व पुजारी उपस्थित होते.

 

Visits: 205 Today: 1 Total: 2124310

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *