रोहित कानडे यांच्या कलेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून कौतुक

नायक वृत्तसेवा, कोल्हार
राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील कोल्हापुरी फेटा बांधण्यात तरबेज असणाऱ्या रोहित कानडे यांच्या कलेचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कौतुक केले.

राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील कोल्हापुरी फेटा बांधणी व्यवसायातील रोहित एकनाथ कानडे यांनी आजवर सर्वच क्षेत्रातील अनेक मान्यवरांना फेटे बांधलेले आहेत. या कलेतून त्यांच्या फेटा व्यवसायाला राज्यभर ओळख मिळाली. आणि आता महाराष्ट्राबाहेर देखील त्यांच्या फेटा बांधणीच्या कलेला मागणी वाढली आहे.

विजयादशमीनिमित्त नुकतेच उत्तर प्रदेश येथील श्री क्षेत्र गोरखपूर येथील शोभायात्रेत त्यांना उपस्थित मान्यवरांना सन्मानाने फेटा बांधण्यासाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी रोहित कानडे यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शिष्य परिवाराला अस्सल महाराष्ट्रीयन फेटे बांधले. यावेळी कानडे यांच्या कलेचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचे कौतुक केले.

Visits: 72 Today: 2 Total: 1106132
