संगमनेरात पुन्हा झुंडगिरीतून पाचजणांना बेदम मारहाण! किरकोळ अपघाताचे कारण; वाढत्या दादागिरीविरोधात शहरात संताप..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
दोन दुचाकींचा एकमेकांना धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरुन काहीजणांकडून त्या दुचाकीस्वारासह त्यांच्या मदतीला धावलेल्या अन्य तिघांनाही बेदम मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार संगमनेरात घडला. सामाजिक सौहार्दाला धक्क्या देणार्या या घटनेत प्रचंड वर्दळीच्या तीनबत्ती चौकात विशिष्ट समाजाच्या उघड दादागिरीचे प्रदर्शन घडले. मोपेडला दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरुन सुरुवातीला दोघांनी आणि त्यानंतर अचानक अवतरलेल्या जमावातील पाच ते सातजणांनी धक्का लागलेल्या दुचाकीस्वारासह त्यांच्या मदतीला धावलेल्या तिघांनाही लोखंडी अझक वस्तूसह कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली. या घटनेने शहरात विशिश्ट समुदायाकडून वाढत असलेल्या दादागिरीच्या घटना पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्या असून या घटनेनंतर शहरातून संताप व्यक्त होत आहे. या घटनेने पुन्हा एकदा शहराच्या सामाजिक सौहार्दाला नख लावण्याचा प्रयत्न केला आहे. धक्कादायक म्हणजे या घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप एकाही आरोपीची ओळख पटवता आलेली नाही.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार शनिवारी (ता.14) सायंकाळी साडेसातच्या सुमारास तीनबत्ती चौकानजीक असलेल्या पेट्रोलपंपासमोर घडला. सायंकाळच्यावेळी असलेल्या गर्दीतून वाट काढीत जात असताना इंदिरानगर येथील बापू काळे व त्यांचा जोडीदार महेश शिंदे आपल्या स्प्लेंडर मोटर सायकलवरुन जात असताना त्यांच्या समोरुन येणार्या एक्टिव्हा मोपेडशी त्यांची धडक झाली. त्यातून मोपेडवरील दोघांनी थेट दुचाकीवरील दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. हा प्रकार पाहुन अमोल गोसावी नावाचा तरुण मध्यस्थीसाठी धावला. त्याला मोरहाण करण्यात आली. वर्दळीचा रस्ता असल्याने क्षणात मोठी गर्दीही झाली. मात्र मार खाणारे वेगळ्या समाजाचे असल्याचे पाहुन कोणीही त्यांच्या मदतीसाठी पुढे आले नाही.
निमोण येथील वास्तू विशारद मिलिंद घुगे त्याचवेळी कोल्हेवाडीकडे जात होते. पंपाजवळ झालेली गर्दी पाहुन त्यांनी आपली दुचाकी थांबवून तेथे जावून पाहीले असता तिीन-चार तरुण तिघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत असल्याचे त्यांनी पाहीले. त्यावेळी अरे तुम्ही का मारता त्यांना अशी विचारणा घुगे यांनी केली. त्यावर कायद्याचा धाक नसलेल्या एका गुंडाने ‘तु हमारे बिच में बोलने वाला कोण?’ अशा दमात घेत त्यांनाच सवाल केला. त्यावर ‘आपण सुजय विखे पाटलांचे कार्यकर्ते असल्याचे’ उत्तर घुगे यांनी देताच त्यातील एका गुंडाने ‘तुम्हारा सुजय दादा क्या करलेगा?’ अशा मस्तवाल भाषेत त्याला प्रत्त्यूत्तर दिले. घुगेंनीही हातात मोबाईल घेवून पोलिसांना कळवण्याचा प्रयत्न केला. माऋ तत्पूर्वीच एका गुंडाने त्यांच्या हातातील महागडा मोबाईल हिसकावून घेत क्षणात तो फोडून टाकला.
त्यानंतर कंबरेचा बेल्ट काढून त्यांना अर्वाश्च शब्दात शिवीगाळ करीत मारहाण सुरु झाली. एकाने हातात टणक असलेल्या लोखंडी वस्तूने त्यांच्यावर प्रहार केले. हा प्रकार पाहुन पंचायत समितीजवळ राहणारे अविनाश गुंजाळ त्यांच्या मदतीला धावले. त्यांनाही उन्माद चढलेल्या त्या पाच ते सातजणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. या गदारोळात त्यांच्या गह्यातील सोनसाखळीही ओरबाडून नेण्यात आली. त्याचवेळी पोलिसांचे वाहन आल्याने प्रेक्षक म्हणून मारहाणीचा आसुरी आनंद घेणारी गर्दी ओसरली. मारहाण करणारे गुंडही क्षणात पसार झाले.
या प्रकरणी पोलिसांनी जखमी असलेल्या मिलिंद घुगे यांच्या फिर्यादीवरुन ‘घार्या’ आणि ‘हुजेब’ अशी अर्धवट नावे माहिती असलेल्या दोघांसह अज्ञात पाच जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेचे कलम 119 (1), 118 (1), 189 (2), 191 (3), 190, 324 (4), 115 (2), 351 (2), 352 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून आरोपींचा शोध सुरु केल्याचे सांगितले जात आहे. मात्र या घटनेला दोन दिवस उलटूनही पोलिसांना अद्याप घटनेत सहभागी असलेल्या आरोपींची नावेही निष्पन्न करता आलेली नाहीत. या घटनेने शहरात पुन्हा एकदा जातीय तणावाची स्थिती निर्माण झाली असून वारंवार झुंडगिरी करुन दहशत निर्माण करण्याच्या या प्रकाराचा संताप व्यक्त होत आहे.
गेल्याकाही वर्षांपासून एका समुदायाकडून किरकोळ कारण पुढे करुन दुचाकीस्वार, वाहनधारकांना झुंडीने गोळा होवून मारहाण करण्याच्या घटना वाढत आहेत. यापूर्वी कोल्हेवाडी रोड, जोर्वेरोड यासारख्या ठिकाणी नियमित घडणार्या अशा घटना आता संगमनेर शहरात प्रवेश करण्याच्या मुख्यमार्गावरही घडू लागल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता या प्रकरणात दोषी असलेल्या सर्वच्या सर्व आरोपींचा ठावठिकाणा शोधून त्यांच्यावर कायद्याची जरब निर्माण करण्याची गरज आहे, अन्यथा अशा वाढत्या घटनांनी शहराचे सामाजिक सौहार्द नष्ट होण्याची भीती निर्माण झाली आहे.