संगमनेर शहरातील पहिल्या फेरीत बाळासाहेब थोरात यांना मताधिक्य! शहरी मतमोजणीला सुरुवात; पहिल्याच फेरीत थोरातांकडे कल..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पहिल्या फेरीपासूनच अपवाद वगळता कमी-जास्त मतांची आघाडी घेणाऱ्या अमोल खताळ यांनी सलग दहा फेऱ्यांमध्ये ग्रामीण भागात घोडदौड कायम ठेवली असतानाच अकराव्या फेरी पासून सुरु झालेल्या शहरी मतदानाच्या पहिल्या फेरीत शहरी मतदारांनी मात्र थोरात यांच्या बाजूने अधिक प्रमाणात मतदान केल्याने खताळांच्या मताधिक्यात घट झाली आहे. दैनिक नायकच्या विश्वसनीय सूत्रांकडून हाती आलेल्या माहितीनुसार शहरी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत अमोल खताळ यांच्या घोडदौडीला काहीसा ब्रेक लागला असून अकराव्या फेरीअखेर बाळासाहेब थोरात आणि अमोल खताळ यांच्यातील मतांची तफावत 5 हजार 395 मतांवर आली आहे. यानंतरच्या 12 आणि 13 या दोन्हीही फेऱ्या शहरी मतदारांच्या असणार आहेत. पहिल्या फेरीत मुस्लिम बहुल भागाचा समावेश आहे. या फेरीत अमोल खताळ यांना 2 हजार 684 आणि बाळासाहेब थोरात यांना 7 हजार 443 मते मिळाली आहेत. हे
