संगमनेर खुर्द मधूनही अमोल खताळच! आता दस हजारी मताधिक्य; शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात अधिक नाराजी असल्याचे स्पष्ट..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आज सकाळी ग्रामीण भागातील मतमोजणीपासून कासवगतीने वाढत जाणारे महायुतीच्या अमोल खताळ यांचे मताधिक्य शहरी मतदारांनी वाढवले आहे. बाराव्या फेरीत बाळासाहेब थोरात यांना दिलासा देणाऱ्या शहरातून नंतरच्या दोन फेऱ्यातही अमोल खताळ व बाळासाहेब थोरात यांना जवळपास समसमान मध्ये मिळाली. मात्र त्यातही खताळ यांनी प्रत्येकी सुमारे दोन हजार मतांची आघाडी घेतली. त्यामुळे खताळ आणि थोरात यांच्यातील मतांचे अंतर आता पुन्हा दहा हजारांच्या पार गेले आहे. यानंतर जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या संगमनेर खुर्द गटासह धांदरफळ गटातील गावनिहाय मतमोजणी होणार आहे. त्यातून समोर येणारा कल या निवडणुकीचे भवितव्य ठरवणार आहे. चौदाव्या फिर अखेर महायुतीचे अमोल कदम यांना 77 हजार 403 तर, महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात यांना 67 हजार 339 मते मिळाली होती. त्यामुळे त्यांच्यातील मतांची तफावत आता 10 हजार 64 मतांवर गेली आहे.

Visits: 91 Today: 1 Total: 403885