जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत ‘ध्रुव ग्लोबल’ अव्वल संगमनेरात पार पडली स्पर्धा; विभागीय स्पर्धेसाठीही झाली निवड


नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर जिल्हा क्रीडा कार्यालयाच्यावतीने संगमनेरातील ध्रुव ग्लोबल स्कूलच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूल अव्वल ठरली. जिल्ह्यातील विविध शाळांच्या ३७ संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत ध्रुवच्या १४, १७ व १९ वर्षांखालील रस्सीखेच खेळाडूंनी २७ सुवर्णसह १८ कांस्यपदकांची कमाई केली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ध्रुवच्या खेळाडूंची विभागीय रस्सीखेच स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

चौदा वर्षांखालील मुलींच्या गटात खेळताना ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पूर्वा पवार, आर्या पाटील, श्रद्धा साठे, ज्ञानेश्वर देवकर, पालवी चुत्तर, कादंबरी, तन्वी ठोंबरे, वैष्णवी तनपुरे व स्वरा वलवे यांनी सुवर्णपदके पटकाविली. तर, याच वयोगटातील मुलांमध्ये श्रेयस महाले, ईशान अंभोरे, मधुरम माहेश्वरी, आर्य लव्हाळे, आयुष चुत्तर, सोहोम मेहेर, अनय पलोड, आर्यन सत्रे व ओम पवार यांनी कांस्यपदक मिळविले.

सतरा वर्षांखालील मुलांच्या गटात व्यंकटेश अग्रवाल, श्लोक गिल्डा, आदित्य लांडगे, शार्दूल मते, अरिहंत मुथा, युवराज बेंद्रे, वंश जेठा, पुष्कर जोर्वेकर व राजवीर घुले यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तर, मुलींच्या गटात आंचल चिंतामणी, कृष्णा बलदेवा, आरुषी मदान, माही भंडारी, स्वरा भामरे, शरयू धूत, पवित्रा पाटील, रिद्धी राऊत व सायली अनुभुले यांना कांस्यपदकावर समाधावे लागले. १९ वर्षांखालील मुलींच्या गटाने ध्रुवच्या संघाला सुवर्णपदक मिळवून देतांना श्रावणी संचेती, मयुरी गिते, आर्ची अग्रवाल, कृतिका चोरडिया, सौम्या वाणी, नित्या सराफ, सर्वदा बाणखेले, हर्षिका म्हस्के व राशी टोकसे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.

या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या १७ व१९ वर्षांखालील मुली व १७ वर्षांखालील मुलांच्या संघाने थेट विभागीय स्पर्धेत प्रवेश मिळवला. क्रीडा विभागप्रमुख गिरीश टोकसे, प्रशिक्षक ज्ञानेश्वर भोत व प्रशांत भंडारी यांनी ध्रुवच्या खेळाडूंना मार्गदर्शन केले. जिल्हास्तरीय रस्सीखेच स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Visits: 162 Today: 1 Total: 1854534

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *