शेतकर्‍यांनी सेवा सोसायटीमधूनच कर्ज घ्यावे ः कोरे सावरगाव घुले येथे सीएससी सेंटरचे उद्घाटन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
सावकारकीपासून शेतकरी लांब राहिला पाहिजे. त्यासाठी शेतकर्‍यांनी सेवा सोसायटीमधूनच कर्ज व इतर सुविधा घेतल्या पाहिजे, असे आवाहन सहकारी संस्थेचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी व्यक्त केले.

संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील पहिल्या सीएससी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकारी संस्थेचे पर्यवेक्षक निलेश सुपेकर, सारोळे पठारचे जिल्हा बँकेचे शाखाधिकारी विवेक पाबळे, सोसायटीचे अध्यक्ष संतोष बन्सी घुले, उपाध्यक्ष रमाजी आमले, शेतकी संघाचे माजी संचालक अर्जुन घुले, सोसायटीचे माजी अध्यक्ष लहानू त्रिंबक घुले, तंटामुक्तीचे अध्यक्ष जालिंदर घुले, पत्रकार गोरक्षनाथ मदने, सचिव बाळासाहेब गणपत घुले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

संगमनेर तालुक्यातील सहकार हा अतिशय चांगला आहे. येथील सहकारी संस्थेचे पदाधिकारी घरी घेऊन जाणारे नाहीत, त्यामुळे सेवा सोसायटी देखील तेजीत सुरु आहे. आज सुरु केलेल्या सीएससी सेंटरमध्ये शेतकर्‍यांना गावातच १५२ प्रकारच्या सुविधा मिळणार आहे. त्यामुळे शेतकर्‍याचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाचणार आहे. संस्था मोठी करण्यात सर्वांचं योगदान महत्वाचे आहे, असेही उपनिबंधक कोरे यांनी नमूद केले. यावेळी रमाजी आमले, अर्जुन घुले, गोरक्षनाथ मदने आदिंनी आपल्या भाषणातून ग्रामस्थांना केंद्र अधिक गतिमानतेने सुरु ठेवण्याची जबाबदारीची जाणीव करून दिली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विमा प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष संतोष घुले यांनी केले तर आभार सचिव बाळासाहेब घुले यांनी मानले. ग्रामस्थांची उपस्थिती यावेळी लक्षणीय होती.

Visits: 14 Today: 1 Total: 83332

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *