दोषांची वजाबाकी हाच जीवनाच्या यशाचा मार्ग : व्हि. के. मोहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
निसर्ग आणि गीता हे व्यवस्थापन शास्त्रातील उत्तम गुरु आहेत. निसर्ग आणि शास्त्र यांची योग्य सांगड घालून त्यातून चांगले ते निवडायला हवे. वृक्षांची परोपकारी वृत्ती मानवाला त्याग करायला शिकवते. स्वतःला ओळखून आपल्यातील क्षमता विकसित करतांनाच गुणांचा गुणाकार आणि दोषांची वजाबाकी करण्यातच जीवनाच्या यशाचा मार्ग दडलेला आहे असे प्रतिपादन भारतीय वन सेवेतील वरिष्ठ सेवानिवृत्त अधिकारी व्हि. के. मोहन यांनी केले.

डॉ.आर.एस. गुंजाळ वेलफेअर फाउंडेशन संचलित वृंदावन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि वृंदावन कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी जीवन कौशल्य या विषयावर मार्गदर्शन करताना व्हि. के. मोहन बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधेश्याम गुंजाळ यावेळी म्हणाले, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर चांगली जीवन कौशल्य आत्मसात करायला हवीत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक विकास होऊन जीवनात यश मिळविता येते.
यावेळी कार्यकारी अधिकारी ॲड.शरद गुंजाळ, प्राचार्य डॉ. अरुण जाधव, प्रा. डॉ. जयसिंग लामटुळे, जनसंपर्क अधिकारी काशिनाथ गुंजाळ, प्रा. योगेश एखंडे आदींसह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन कु. दिशा जाधव हिने केले तर कु. साक्षी डोंगरे हिने आभार मानले.
Visits: 73 Today: 3 Total: 1102314
