अकोलेत जनसंघर्ष संघटनेच्यावतीने तहसीलसमोर उपोषण दुधाला ३४ रुपये भाव देण्यासह पशुखाद्याचे दरही कमी करण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, अकोले
दुधाचे दर पुन्हा एकदा कोसळल्याने उत्पादक संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर जनसंघर्ष संघटनेच्यावतीने गुरुवारी (ता.२३) उपोषण करण्याचा इशारा अकोले तहसीलदारांना निवेदनातून दिला होता. त्यानुसार उपोषणाला सुरुवात झाली असून, त्यास पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनीही पाठिंबा दर्शवत या लढ्यात दूध उत्पादकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३.५ ते ८.५ एसएनएफ असणार्‍या दुधास ३४ रुपये प्रतिलिटर भाव जाहीर केला होता. तसेच पशुखाद्याचे दर १५ ते २० टक्क्यांनी कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अवघा महिनाभर हा भाव देण्यात आला. आता सहकारी व खासगी दूध संस्था २७ रुपये भाव देऊन दूध उत्पादकांची फसवणूक करत आहे. तसेच खाद्याचे दरही कमी केलेल नाही. त्यामुळे दूध उत्पादक संकटात सापडले आहे.

या पार्श्वभूमी जनसंघर्ष संघटनेने तहसीलदार सतीष थेटे यांना निवेदन देऊन् येत्या सात दिवसांत यावर उचित कार्यवाही करुन प्रतिलिटर ३४ रुपये भाव आणि पशुखाद्याचे दीडशे रुपयांनी भाव कमी करावे. याचबरोबर जुलै महिन्यानंतर कमी भाव देऊन शेतकर्‍यांची जी फसवणूक झाली आहे ती भरपाईच्या स्वरुपात शेतकर्‍यांना द्यावी, अशी मागणी केली होती. अन्यथा गुरुवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप दराडे यांसह सदस्यांनी दिला आहे. त्यानुसार हे उपोषण सुरू झाले असून, अनेकांचा याला पाठिंबा मिळत आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 115814

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *