शहीद जवान वलटे यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही ः आ.काळे

शहीद जवान वलटे यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही ः आ.काळे
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव तालुक्याचे सुपुत्र वीर जवान नायब सुभेदार सुनील वलटे देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत असताना हुतात्मा झाले. त्यांनी देशसेवेसाठी दिलेल्या बलिदानातून व त्यांनी दाखविलेल्या शौर्याची तरुण पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी दहेगाव बोलका ग्रामस्थांनी त्यांचे उभारलेले स्मारक हे खरोखरच अभिमानास्पद आहे. त्यांच्या बलिदानामुळे तालुक्याने शूर भूमिपुत्र गमावला असून त्यांचे बलिदान देश कधीही विसरणार नाही असे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले.


सराला बेटाचे मठाधिपती महंत ह.भ.प रामगिरी महाराज यांच्या हस्ते समस्त ग्रामस्थ दहेगाव बोलका, स्मारक समिती व शहीद परिवार यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शहीद जवान सुनील वलटे यांच्या स्मारकाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी श्रद्धांजली वाहून पुष्पचक्र अर्पण केले. शिरसगाव (ता.श्रीरामपूर) ग्रामपंचायतीच्यावतीने शहीद जवान वलटे यांच्या कुटुंबियांना 50 हजार रुपयांचा धनादेश आमदार काळे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, कोपरगाव ग्रामीण पोलीस निरीक्षक अनिल कटके, काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कोपरगाव जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर, वीरपिता रावसाहेब वलटे, वीरमाता सुशीला वलटे, वीरपत्नी मंगल वलटे, भाऊ अनिल वलटे, मुलगा वेदांत वलटे, जगन बागल, अनिल वलटे, अशोक भोकरे, भास्कर वलटे, रावसाहेब आभाळे, गुलाबराव देशमुख, आबा रक्ताटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Visits: 138 Today: 1 Total: 1574276

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *