श्रीरामपूर तालुका ‘अंनिस’ची कार्यकारिणी जाहीर
श्रीरामपूर तालुका ‘अंनिस’ची कार्यकारिणी जाहीर
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या श्रीरामपूर तालुका अध्यक्षपदी प्राचार्य पोपट शेळके तर कार्याध्यक्षपदी दादासाहेब साठे यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली आहे.

श्रीरामपूर ‘अंनिस’ शाखेची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये पुढील तीन वर्षांसाठी नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान सुनील साळवे यांनी भूषविले. तर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी प्रा.प्रतिज्ञा पत्की, सचिवपदी प्रवीण साळवे, कोषाध्यक्षपदी प्रमोद पत्की, प्रा.सुप्रिया साळवे, राजेंद्र केदारी, प्रतापराजे भोसले, सुनील साळवे, सुरेश वाघुले यांच्या निवडी करण्यात आल्या. तसेच तालुका कार्यकारिणीमध्ये भरत कंकुलोळ, संतोष जाधव, सुरंजन साळवे, पराग कारखानीस, उल्हास मराठे, संजय दुशिंग, बाळासाहेब सोनटक्के यांचा समावेश आहे. या निवडीबद्दल अंनिसच्या कार्यवाहक रंजना गवांदे यांनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.

