संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलची उज्ज्वल निकालाची परंपरा कायम! जिल्ह्यात मारली बाजी; वाकचौरे, कासार, शेळके व शिंदे चमकले

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यानी जिल्ह्यात बाजी मारली आहे. शाळेने यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखताना इयत्ता दहावीच्या जय नीलेश वाकचौरे व श्रेयान अनिकेत कासार यांनी प्रत्येकी 98 टक्के गुण मिळवताना जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, ध्रुवच्याच संस्कृती दत्तू शेळके (97.80 टक्के) व श्रीशा विराज शिंदे (97.40 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवताना ध्रुव ग्लोबलच्या यशाची पताका फडफडती ठेवली आहे.

याशिवाय श्रीरंग गिरीश नाझीरकर, अद्वैत विवेक तळणीकर, तनया विक्रम गाडे, अनय सचिन नवले, अमनदीप नितीन आरोटे, गायत्री विजय घुले, पृथ्वीराज प्रशांत देशमुख, जय विलास बेनके, साईतेज दादासाहेब सानप, समृद्धी महेश कर्पे, कृष्णा रमेश दिवटे, निषाध संजय विखे, यश भाऊसाहेब डामसे, जीया अमित बाफना, ओम वेणूनाथ शिंदे, ऋतुजा संतोष बेनके, साई शरद वाकचौरे, पार्थ संदीप चोथवे, मोहित मंगवानी, अद्वय अनिल जोशी, ओम रामनाथ कानवडे, तनय रवींद्र डावरे, दिव्या देविदास देशमाने व कृष्णा संतोष आरोटे या विद्यार्थ्यांनी नव्वद टक्क्यांहून अधिक गुण मिळवले.

मराठी विषयात श्रीशा शिंदे, अमनदीप आरोटे, ऋतुजा बेनके, समृद्धी कर्पे आणि यश डामसे यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले. तर जय वाकचौरे, अद्वैत तळणीकर, साईतेज सानप यांनी गणित विषयात शंभर गुण मिळवले. जय वाकचौरे आणि श्रीशा शिंदे यांनी समाजशास्त्र तर जीया बाफनाने आर्थिक व्यवस्थापन विषयात पूर्णच्या पूर्ण गुण प्राप्त केले. इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेत साहिल वाळुंज (95.6 टक्के), हर्ष अभिजीत भावसार (89.2 टक्के), ईश्वरी रेवगडे (82.6 टक्के), सुहानी अनिल नरवडे (81.2 टक्के) आणि सुमित दिलीप बंडाळे (80.2 टक्के) यांनी अनुक्रमे एक ते पाच क्रमांक मिळवताना ध्रुवच्या यशस्वी निकालाची परंपरा उंचावत नेली.

बारावी वाणिज्य विभागातही यशाचा सिलसिला कायम राखताना संस्कृती सचिन गणोरे (91.6 टक्के), वैष्णवी महेश गोवर्धने (88.2 टक्के), प्रिन्सेस जेबराज नादार ( 87.8 टक्के), अमनदीपसिंग पंजाबी (87.6 टक्के), भूमी खुटेटा, सिद्धी साठे आणि युगंधर भुजाडी (दोघेही 87 टक्के) यांनी अनुक्रमे पहिला ते पाचवा क्रमांक पटकावला. तर, ओम चंद्रसेन घुले याने शारीरिक शिक्षण या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी, व्हा. चेअरमन गिरीश मालपाणी व प्राचार्या अर्चना घोरपडे यांनी अभिनंदन केले आहे.
