… तरच त्याच्या पाठिशी नाभिक बांधवांनी भक्कम उभे रहावे ः राऊत
… तरच त्याच्या पाठिशी नाभिक बांधवांनी भक्कम उभे रहावे ः राऊत
नायक वृत्तसेवा, अकोले
संघटना म्हणजे नेमकी काय? जी व्यक्ती आपल्या प्रत्येक सुख-दुःखात उभी राहील, अन्याय-अत्याचारापासून आपले संरक्षण करेल, शासन दरबारी आपल्या समस्या मांडेल, ती व्यक्ती ज्या संघटनेत असेल त्याच्या पाठिशी नाभिक बांधवांनी भक्कम उभे राहिले पाहिजे असे आवाहन दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत यांनी व्यक्त केले.
अकोले शहरात नाभिक महामंडळाच्यावतीने आयोजित शिवरत्न जिवाजी महाले जयंतीदिनी ते बोलत होते. यावेळी नाभिक समाजातील दहावी आणि बारावीमध्ये उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर उत्तर नगर जिल्हाध्यक्ष योगेश शिंदे, वृत्तवाहिनी व वृत्तपत्राचे संपादक गोरक्षनाथ मदने, संगमनेर तालुकाध्यक्ष बाबा जाधव, कार्याध्यक्ष कचेश्वर वाकचौरे, अकोले तालुकाध्यक्ष किरण चौधरी, प्रशांत भालेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. वीररत्न जिवाजी महाले, संत सेना महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. भविष्यात नगर जिल्ह्यातील सलून व्यवसाय करणार्या नाभिक बांधवांचा विमा उतरविण्यात येणार आहे. तर शिर्डी येथे भव्य समाज मंदीर आणि मंगल कार्यालय उभारण्याचा मनोदय योगेश शिंदे यांनी व्यक्त केला. समाजाच्या सुख-दुःखात आम्ही नेहमीच सहभागी राहणार आहोत. ज्यांनी संघटना स्थापन केली तेच संघटनेतून बाहेर पडल्याची टीका शिंदे यांनी केली. यावेळी महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा उपाध्यक्षपदी बाळासाहेब मदने, अकोले तालुकाध्यक्षपदी किरण चौधरी, संघटक पदी गोकुळ वाघ यांची पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर अकोले ग्रामीण भावफलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक रमेश वाघ यांनी केले तर समारोप केशव कोल्हाळ यांनी केला. यावेळी अकोले शहराध्यक्ष आत्माराम शिंदे, प्रशांत विश्वासराव, संजय बिडवे, वैभव बिडवे, बाबा कदम, विकास शिंदे, दत्तात्रय चौधरी, गोरक्ष कोल्हाळ, विजय काळे, सुखदेव जाधव, गणेश सोनवणे, मंगेश शिंदे, चेतन बिडवे, नीलेश सोनवणे, सुनील चव्हाण, माधव कोल्हाळ, साहेबराव पंडीत, नवनाथ काळे, भूषण भालेराव, प्रकाश भालेराव आदी कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.