अगस्तिचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करू ः पिचड
अगस्तिचा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करू ः पिचड
नायक वृत्तसेवा, अकोले
अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा बहुप्रतीक्षित इथेनॉल प्रकल्प या गळीत हंगामाबरोबर कार्यान्वित होत आहे. कोरोना महामारी प्रादुर्भावात ऊस तोडणी कामगारांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊन गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला जाईल असा विश्वास कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री मधुकर पिचड यांनी व्यक्त केला आहे.

अगस्ति साखर कारखान्याचा सन 2020-21 चा बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगाम शुभारंभ योगी केशवबाबा चौधरी व माजी मंत्री पिचड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर होते. यावेळी संचालक प्रकाश मालुंजकर, गुलाब शेवाळे, कचरू शेटे, रामनाथ वाकचौरे, अशोक देशमुख, अशोक आरोटे, मीनानाथ पांडे, भाऊसाहेब देशमुख, सुनील दातीर, राजेंद्र डावरे, बाळासाहेब ताजणे, सुरेश गडाख, भास्कर बिन्नर, सुरेखा देशमुख, मनीषा येवले व कार्यकारी संचालक भास्कर घुले उपस्थित होते. तर संचालक गुलाब शेवाळे, अशोक आरोटे, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले व कामगार प्रतिनिधी अशोक पापळ यांच्या हस्ते सपत्नीक बॉयलर अग्निप्रदीपन तर संचालक अशोक देशमुख यांच्या हस्ते गव्हाण पूजन करण्यात आले. प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली तर यावर्षी सहा ते सात लाख मेट्रीक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असल्याचे पिचड म्हणाले. प्रास्ताविक संचालक महेश नवले यांनी केले. सूत्रसंचालन कार्यकारी संचालक भास्कर घुले यांनी केले तर आभार अशोक देशमुख यांनी मानले.
![]()
