ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन
ग्रामसेवकांच्या विविध मागण्यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
येथील एम. एम. बी. टी. दंत महाविद्यालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची रविवारी (ता.11) ग्रामसेवक संघटनेचे राज्याध्यक्ष एकनाथ ढाकणे यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री आणि सर्व प्रधान सचिव यांची एकत्रित बैठक आयोजित करून ग्रामसेवकांच्या न्याय्य मागण्या मंजूर होणेबाबत आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती या निवेदनातून करण्यात आली आहे. त्यास प्रतिसाद देत नजीकच्या काळात लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे मान्य करून ग्रामसेवकांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेण्याचे मंत्री थोरात यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ अहमदनगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पावसे, ग्रामसेवक सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष गंगाधर राऊत, ग्रामसेवक संघटनेचे राज्य कौन्सिलर सुरेश मंडलिक, ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक विशाल काळे, तालुका समन्वयक राहुल वाळके, संगणक परिचालक आदी उपस्थित होते.