मुलाचा शोध घेणार्या आईवर तरुणाने केला अत्याचार राहाता पोलिसांत गुन्हा दाखल; धक्कादायक प्रकाराने उडाली खळबळ
![]()
नायक वृत्तसेवा, राहाता
पेरुच्या बागेत मुलाचा शोध घेण्यास गेलेल्या 32 वर्षीय महिलेवर एका तरुणाने अत्याचार केल्याची घटना साकुरी (ता.राहाता) शिवारात घडली. याबाबत पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध राहाता पोलिसांनी अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिलेचा मुलगा हा गोदावरी वसाहत येथील त्याच्या मित्रांबरोबर खेळण्यासाठी गेला होता. तो बराच वेळ झाला तरी घरी न आल्याने आई व पीडित महिला त्याला शोधण्यासाठी घराबाहेर पडल्या. आई बनसोडे मळ्याकडे त्याला शोधण्यासाठी गेली व पीडित महिला साकुरी शिवारातील दंडवते यांच्या पेरुच्या बागेकडे जात असताना महिलेच्या ओळखीचा कुणाल विजय शिंदे (रा. गोदावरी वसाहत) हा दंडवते यांच्या पेरुच्या बागेजवळ भेटला आणि म्हणाला ताई इकडे काय करता.

तो ओळखीचा असल्यामुळे पीडिता त्याला म्हणाली, माझा मुलगा घरी आला नाही, त्याला शोधत आहे. त्यावर तो मुलाला शोधण्यासाठी मदत करतो असे म्हणाला. त्यानंतर दंडवते यांच्या पेरुच्या बागेत जात असताना कुणाल शिंदे महिलेच्या पाठीमागून आला व त्याने मिठी मारून दोन्ही हाताने तोंड दाबून दंडवते यांच्या बागेत घेऊन गेला. तेथे महिलेवर अत्याचार केला. त्यावेळी महिलेने त्याच्याशी झटापट केली असता त्याने गळ्याला हाताच्या नखांनी जखमी केले. महिलेने ओरडण्याचा प्रयत्न केला, परंतु बागेत कोणी नसल्यामुळे मदतीला कोणीही आले नाही. याउपर झालेल्या प्रकाराबाबत तू कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलाला गळा कापून ठार मारीन अशी धमकी दिली.

सदर प्रकार पीडित महिलेने घरी गेल्यानंतर बहिणीला सांगितला. त्यानंतर आई, मुलाला शोधून घरी आली होती. तिलाही घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर आई व बहीण दोघीही तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात घेऊन आल्या. तेथे संपूर्ण आपबिती कथन केल्यानंतर पोलिसांनी आरोपी कुणाल शिंदे याच्याविरुद्ध भादंवि कलम 376, 323, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपीचा शोध पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे घेत आहेत.
