भाजप किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी कानवडे

भाजप किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी कानवडे
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती तथा भाजप नेते सतीष कानवडे यांची भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण पसरले आहे.


तालुक्यातील सावरचोळी येथील रहिवासी असलेले सतीष कानवडे हे प्रगतिशील शेतकरी म्हणून सुपरिचित आहे. शेतकर्‍यांच्या माध्यमातून त्यांनी मोठे संघटन उभे केले आहे. बाजार समितीच्या माध्यमातून चालू असलेल्या बीज बँकेमार्फत ते शेतकर्‍यांसाठी कार्यरत असतात. भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे आणि उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी त्यांच्यावर नुकतीच किसान मोर्चाची जबाबदारी सोपवली आहे. या निवडीबद्दल माजी मंत्री विखे, प्रा.राम शिंदे, माजी आमदार वैभव पिचड यांसह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या जबाबदारीतून शेतकर्‍यांसाठी निश्चितच चांगले काम करु असा विश्वासही कानवडे यांनी व्यक्त केला आहे.

Visits: 194 Today: 1 Total: 1914660

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *