नूतन न्यायालय इमारतीत लवकरच कामकाज सुरू होईल ः थोरात

नूतन न्यायालय इमारतीत लवकरच कामकाज सुरू होईल ः थोरात
घुलेवाडी फाटा येथील अद्ययावत न्यायालय इमारतीची केली पाहणी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
न्यायालयाचे कामकाज एकत्रित व सोयीस्कररित्या व्हावे यासाठी घुलेवाडी फाटा येथे उभ्या राहिलेल्या अद्ययावत व वैभवशाली अशा प्रशस्त न्यायालय इमारतीची पाहणी शुक्रवारी (ता.9) काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली असून या इमारतीत लवकरच कामकाज सुरू होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.


संगमनेर शहराजवळील घुलेवाडी फाटा येथे उभ्या राहिलेल्या अद्ययावत वैभवशाली इमारतीच्या पाहणीवेळी तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, सभापती सुनंदा जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, दिलीप पुंड, वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड.सुहास आहेर, जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, के. के. थोरात, उपाध्यक्ष अ‍ॅड.त्र्यंबक गडाख, अशोक हजारे, नानासाहेब शिंदे, बार असोसिएशनचे सुनील गाठे, अमित सोनवणे, मधुकर गुंजाळ, प्रकाश रहाणे, सचिन डुबे, अमोल घुले, कैलास सरोदे, राजेश खरे, प्रकाश गुंजाळ, सीताराम राऊत, घुलेवाडीचे सरपंच सोपान राऊत, वंदना गुंजाळ, प्रशांत गुंजाळ, सुरेश थोरात, कैलास पानसरे, सुभाष सांगळे यांसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.


संगमनेरात न्यायालयीन कामकाज मोठे असून तीन जिल्हा न्यायाधीश, एक दिवाणी न्यायाधीश, पाच वरीष्ठ स्तर न्यायाधीश, पाच दिवाणी व प्रथम दंडाधिकारी न्यायाधीश असे न्यायालय कार्यरत आहेत. सध्याच्या प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असून ती दिवसेंदिवस वाढत आहेत. भविष्यात संघांवर व तालुक्याचा औद्योगिक विकास होत असल्यामुळे येथे औद्योगिक न्यायालय व कामगार न्यायालय असे एकूण 16 न्यायालय होण्याची शक्यता असल्याने ही सर्व न्यायालये एकाच ठिकाणी होण्यासाठी महसूल मंत्री थोरात यांनी आपल्या महसूल मंत्रीपदाच्या काळात राज्य सरकारकडून 33 कोटींचा निधी घेऊन ही अद्ययावत इमारत उभी केली आहे. तसेच वकील असोसिएशनच्या मागणीनुसार महसूल विभागाची काही जागा वकील संघासाठीही उपलब्ध करून दिली आहे.


तसेच सरकारकडून नवीन निधीची मंजुरी घेवून इमारतीत मुख्य अंतर्गत जोड रस्ते, डांबरीकरण व मजबुतीकरण, संरक्षक लोखंडी प्रवेशद्वार, जमीन सपाटीकरण दोनचाकी वाहने, न्यायाधीशांसाठी स्वतंत्र वाहनतळ, इमारत परिसरात विद्युत जनरेटर करणे, सुशोभीकरण, वकील पक्षाचे अंतर्गत फर्निचर याबाबींसाठी निधी मंजूर करून घेतला होता. ही इमारत तालुकास्तरावरील अद्ययावत वैभवशाली अशी महाराष्ट्रातील तालुका स्तरावरील एकमेव इमारत ठरणार आहे. यावेळी प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत, तालुका पोलीस निरीक्षक सुनील पाटील, शहर पोलीस निरीक्षक अभय परमार आदी उपस्थित होते.

Visits: 189 Today: 1 Total: 1778407

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *