राहुरीतील तोरणा हॉटेलची तोडफोड; चौघांविरोधात गुन्हा

राहुरीतील तोरणा हॉटेलची तोडफोड; चौघांविरोधात गुन्हा
नायक वृत्तसेवा, राहुरी
शहरातील हॉटेल तोरणाची चौघांनी तोडफोड करुन तिघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. मागील 15 दिवसांत हॉटेलमधील प्राणघातक हल्ल्याची ही दुसरी घटना आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.


याबाबत प्रवीण विलास कोळसे (रा.मानोरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलिसांनी राहुल ऊर्फ पप्पू गंगाधर कल्हापुरे (रा.देसवंडी), दादा कुलट, किरण कुलट व अमोल कुलट (तिघेही रा.वळण) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सध्या सर्व आरोपी पसार झाले आहेत. या घटनेत निजाम पठाण, प्रमोद दसपुते व ऋषीकेश घोडके जखमी झाले असून, त्यांना अहमदनगरला हलविले आहे. नगर-मनमाड रस्त्यावरील ‘तोरणा’ हॉटेलमध्ये मंगळवारी (ता.6) रात्री साडेनऊ वाजता वरील चार आरोपी आले. हे हॉटेल आम्हांला चालविण्यासाठी घ्यायचे होते, तुम्ही का घेतले? असे म्हणत शिवीगाळ सुरू केली. हॉटेलमधील साहित्याची तोडफोड केली आणि हॉटेलमधील तिघांना जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, चिंचोली येथे नगर-मनमाड रस्त्याच्या बाजूच्या एका हॉटेलमध्ये 15 दिवसांपूर्वी चौघांनी तरुणाला घातक शस्त्रांनी मारहाण केली होती. तशाच हल्ल्याची राहुरी शहरात पुनरावृत्ती घडल्याने खळबळ उडाली आहे.

Visits: 135 Today: 2 Total: 1102018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *