‘एसएमबीटी’ हॉस्पिटलमध्ये उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे आरोग्य शिबिर आत्तापर्यंत 2 लाख 35 हजार 248 रुग्णांना लाभ; विविध शस्त्रक्रिया मोफत
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सामान्य लोकांपर्यंत प्रभावी आणि परिणामकारक आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील एसएमबीटी हॉस्पिटल कायम वचनबद्ध आहे. हॉस्पिटलच्यावतीने 1 मार्च ते 31 मे दरम्यान आयोजित आरोग्य साधना शिबिराचा आत्तापर्यंत 2 लाख 35 हजार 248 रुग्णांनी लाभ घेतला आहे. आरोग्य साधना या तिमाही शिबिरात रुग्णांच्या सर्व आजारांची तपासणी, उपचार आणि विविध शस्त्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत.
प्रत्येक व्यक्तीला आरोग्यदायी जीवन जगता यावे. तसेच कुठलीही व्यक्ती आरोग्य सेवा, सुविधा यापासून वंचित राहू नये, हाच एसएमबीटी हॉस्पिटलच्यावतीने आयोजित आरोग्य साधना शिबिराचा मुख्य उद्देश आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा जनसामान्यापर्यंत पोहोचविल्या जातात. परंतु अनेक रुग्णांना त्या योजनांचा लाभ मिळत नाही. त्यांच्यासाठी आरोग्य साधना शिबिर वरदान ठरत आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आहेत. मात्र, या योजनेत समाविष्ट नसलेल्या शस्त्रक्रिया करण्यासाठी खासगी हॉस्पिटलमध्ये मोठा खर्च येतो. हा खर्च सर्वसामान्य रुग्णांना खर्च परवडण्यासारखा नसतो. त्यावेळी रुग्णांच्या कुटुंबातील सदस्यांची उपचार, शस्त्रक्रिया यासाठी पैसे जमवताना मोठी धावपळ होते. शासकीय योजनेत समाविष्ट नसलेल्या विविध शस्त्रक्रिया आरोग्य साधना शिबिरात माफत दरात करण्यात येत आहेत.
दरम्यान, भिवंडी येथील रमेश भोसले यांना अनेक वर्षे छातीदुखीचा त्रास होता. अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊनही काही फरक पडला नाही. त्यांना एसएमबीटी हॉस्पिटल येथे आरोग्य साधना शिबिरांतर्गत बायपास मोफत होत असल्याचे समजले. येथील सर्वरोग बाह्यरुग्ण तपासणी देखील मोफत असल्याने निदान करण्यात आले. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांच्या निदानास आले की, रमेश यांच्या हृदयात छेद आहे. तसेच अनेकदा वेगवेगळे उपचार घेतल्याने यावरील उपचार क्लिष्ट होणार असल्याचेही त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांकडून कळले. पण डॉक्टरांचा यशस्वी शस्त्रक्रियेचा मोठा अनुभव व हॉस्पिटल प्रशासनाची सेवाभावी वृत्ती पाहून रमेश व त्यांच्या कुटुंबियांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी विश्वास दाखवला. ही जटील शस्त्रक्रिया देखील अनेक अडचणींवर मात करून यशस्वी झाली आणि रमेश यांचे अनेक वर्षांचे दुखणे कायमचे बंद झाले. अशा अनेक हृदयरोग शस्त्रक्रिया एसएमबीटी हॉस्पिटलने यशस्वी करून दाखवल्या आहेत.
तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी!
एसएमबीटी हॉस्पिटलमधील एसएमबीटी हार्ट इन्स्टिट्युट आणि एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्युट येथे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध आहेत. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी प्रचंड दूरून रुग्ण येत आहेत. येथेही तपासणी मोफतच असून तपासणीनंतर उपचार देखील मोफत करण्यात येत आहेत. टाटा स्मारक केंद्र यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाने एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्युट सुरू आहे. त्याचाही लाभ रुग्ण घेत आहेत.
अत्याधुनिक सुविधा!
810 बेडचा आंतररुग्ण विभाग, 110 आयसीयू बेड, 13 मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, अत्याधुनिक कॅथलॅब, 10 एनआयसीयू आणि पीआयसीयू बेड, सुसज्ज अपघात विभाग, 24 तास डायलिसिस, औषधालय सेवा, रक्तपेढी व रुग्णांसाठी मोफत जेवणाची सुविधा, रुग्णांच्या नातेवाईकांसाठी राहण्याची सोय आणि विशेषकरून रुग्णाांना एसएमबीटी हॉस्पिटलपर्यंत पोहोचण्यासाठी शिबिर काळात नाशिक आणि कसारा येथून मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्ण अगदी सहजच हॉस्पिटमध्ये उपचारांसाठी येत आहेत. जळगाव, धुळे, नंदूरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांतील रुग्णांसोबत ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील रुग्णांनाही हे सोईचे ठरत आहे. शिबिराच्या अधिक माहितीसाठी 7720053260, 9145001630 यावर संपर्क साधावा.
रुग्णांचा एसएमबीटीवर विश्वास!
हृदयरोग व हृदयविकार, बालरोग व बालहृदयरोग, कर्करोग, किडनीरोग, मूत्रविकार, मेंदू व मणकेविकार, सांधेरोपण गुडघा व खुबा, क्रिटिकल केअर मेडिसिन, इंटरव्हेंशनल रेडिओलॉजी, पॅरालिसिस (स्ट्रोक), प्लास्टिक सर्जरी, जन्मजात आजार, अस्थिरोग, बालरोग, नेत्ररोग, दंतरोग, कान, नाक, घसा, त्वचा याबरोबरच गुप्तरोग, श्वसन रोग, मानसोपचार, आहार आणि पोषण, अपघात, फिजिओथेरेपी आणि पुनवर्सन यावर उपचारांसाठी रुग्ण मोठ्या संख्येने दररोज एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये येतात. येथील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांची तपासणी करतात. रुग्णाच्या काही तपासण्यात पूर्णपणे मोफत तर काही तपासण्या अत्यंत माफत दरात केल्या जातात.