प्रभातच्या वर्कशॉपमधून चोरी करणार्‍यांना केले गजाआड श्रीरामपूर शहर पोलिसांनी दोघांना मुद्देमालासह केली अटक


नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
येथील प्रभात डेअरी कंपनीच्या मेंटेनन्स वर्कशॉपमध्ये ठेवलेला 58 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरणार्‍या दोघा आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांनी मुद्देमालासह अटक केली आहे.

मंगळवारी (ता.14) प्रभात डेअरी कंपनीच्या मेंटेनन्स वर्कशॉपमध्ये ठेवलेले 43 हजार 400 रुपये किमतीचे 7 स्टीलचे एसएस वॉल, 13 हजार 500 रुपये किमतीचा एक स्टीलचा एसएस वॉल तसेच 1 हजार 600 रुपये किमतीची अंदाजे 12 फूट लांबीची काळ्या रंगाचे आवरण असलेली अर्धा इंची जाडीची कॉपर केबल असा एकूण 58 हजार 500 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी श्रीरामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी तपास पथक नेमले होते. पोलिसांनी सदर चोरीचा तपास करून गोपनीय यंत्रणा व घटनास्थळावरील तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे जीवन सुभाष खरात (वय 27) व आदित्य मच्छिंद्र रगडे (वय 19, दोघेही रा. खिलारीवस्ती, श्रीरामपूर) या संशयितांना गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेत त्यांना विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यावरून पोलिसांनी या दोन्ही आरोपींकडून एकूण 58 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

सदर कारवाई पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एम. पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक दादाभाई मगरे, प्रदीप बोराडे, पोलीस नाईक मच्छिंद्र शेलार, साईनाथ राशीनकर, रघुवीर कारखेले, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, रमीझराजा अत्तार, गणेश गावडे, बाळासाहेब गुंजाळ, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, गौरव दुर्गुळे यांनी केली. अधिक तपास पोलीस नाईक साईनाथ राशीनकर करीत आहे.

Visits: 158 Today: 1 Total: 2124963

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *