अहमदनगर जिल्ह्याचा प्रवास पुन्हा ‘लॉकडाऊन’च्या दिशेने! संगमनेरातही आज उच्चांकी रुग्णवाढ; जिल्ह्यातील शाळाही उद्यापासून बंद..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जिल्ह्यात वाढीस लागलेले कोविडचे दुसरे संक्रमण दररोज भयानक रुप धारण करीत असून या कडीत आजही विक्रमी रुग्ण समोर आले आहेत. आज शासकीय प्रयोगशाळेकडे खाळंबलेल्या अहवालांचा अधिक भरणा असल्याने जिल्ह्यात विक्रमी 1 हजार 347 रुग्ण समोर आले असून जिल्ह्याची कोविड स्थिती बिकट अवस्थेत पोहोचली आहे. आज प्राप्त झालेल्या एकूण अहवालात अहमदनगर महापालिका क्षेत्रातून सर्वाधीक तब्बल 453 तर सर्वात कमी कर्जत तालुक्यातून सात रुग्ण समोर आले आहेत. संगमनेर तालुक्यातून आजही विक्रमी 90 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील 27, ग्रामीणभागातील 56 तर अन्य तालुक्यातील सात रुग्णांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्या आता 8 हजार 395 झाली असून आजच्या स्थितीत तालुक्यातील 656 रुग्ण सक्रीय संक्रमित आहेत. आज 105 रुग्णांना उपचारांती घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकार्‍यांनी उद्यापासून सर्व खासगी व सरकारी शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.


गेल्या दिड महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोविडने पुन्हा एकदा उसळी घेतली असून रोजच्या मोठ्या रुग्णसंख्येने जिल्ह्याची अवस्था गंभीर बनली आहे. जिल्ह्यात रविवारपासून रात्रीचे निर्बंध लागू झाले असले तरीही त्यातून सध्या सुरु असलेला जिल्ह्यातील प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची शक्यता कमीच असल्याने येणार्‍या काळात जिल्ह्यात लॉकडाऊनसारखा अंतिम पर्याय वापरला जाण्याची शक्यता दाटली आहे. वारंवार सूचना देवूनही नागरिकांकडून कोविड नियमांकडे दुर्लक्ष होत असल्याने जिल्ह्याची अवस्था गंभीर झाली आहे. त्यामुळे जिल्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर उभा असल्याचे जाणकारांकडून बोलले जात आहे.


आजही जिल्ह्यात विक्रमी रुग्ण आढळून आले आहेत. आज सकाळी शासकीय प्रयोगशाळेकडून 753, खासगी प्रयोगशाळेकडून 454 व रॅपीड अँटीजेन चाचणीद्वारा 140 अशा एकूण 1 हजार 347 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात अहमदनगर महापालिका क्षेत्रातून सर्वाधीक 453, राहाता 116, कोपरगाव 102, पाथर्डी 92, संगमनेर 90, श्रीरामपूर 75, नगर ग्रामीण 68, शेवगाव 66, जामखेड व श्रीगोंदा प्रत्येकी 60, राहुरी 49, लष्करी परिसरातून 26, पारनेर 26, अकोले 21, नेवासा 18, अन्य जिल्ह्यातील 15, कर्जत तालुक्यातून 7 तर लष्करी रुग्णालयातून 3 रुग्ण समोर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 92 हजार 145 झाली असून आजवर जिल्ह्यातील 1 हजार 192 रुग्णांचे कोविडने बळी घेतले आहेत.


जिल्ह्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्णवाढ होत असल्याने प्रशासनाने टप्प्याटप्प्याने कठोर निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून रविवारी रात्रीपासून जिल्ह्यात रात्रीचा जमावबंदी आदेश लागू झाल्यानंतर आता मंगळवारपासून (ता.30) दहावी व बारावीचे वर्ग वगळता जिल्ह्यातील सर्व खासगी व सरकारी शाळा 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बजावले आहेत.


आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालातून संगमनेरातील 90 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात शहरातील 27, ग्रामीणभागातील 54, अन्य तालुक्यातील 8 तर एकाच व्यक्तिचे दोन अशा एकूण नव्वद जणांचा समावेश आहे. त्यात शहरातील कुंभारआळा परिसरातील 44 वर्षीय इसम (देान ठिकाणी नावे), शिवाजी नगरमधील 54 वर्षीय महिला, ताजणे मळ्यातील 51 वर्षीय इसम, जनता नगरमधील 31 वर्षीश महिला, इंदिरानगर मधील 72 वर्षीय ज्येष्ठासह 60 व 47 वर्षीय महिला, मोमीनपूर्‍यातील 93 वर्षीय वयोवृद्ध, मालदाड रोडवरील 63 वर्षीय दोघा ज्येष्ठ नागरिकांसह 44 वर्षीय महिला, निर्मलनगर मधील 74 वर्षीय महिला, सय्यदबाबा चौकाती 37 वर्षीय तरुण,


सह्याद्री महाविद्यालयाजवळील 35 व 22 वर्षीय तरुणांसह 22 वर्षीय महिला, विद्यानगरमधील 39 वर्षीय तरुण, वाडेकर गल्लीतील 71 वर्षीय ज्येष्ठासह 39 वर्षीय तरुण आणि 39 वर्षीय महिलेसह 13 वर्षीय मुलगी व केवळ संगमनेर असा पत्ता असलेल्या 50, 43 व 32 वर्षीय महिला, 28 व 25 वर्षीय तरुण आणि एक वर्षीय बालिका, ग्रामीणभागातील आंबी परिसरातील 53 वर्षीय महिला, हिवरगाव पठारावरील 42 वर्षीय तरुण, कौठे धांदरफळ येथील 25 वर्षीय तरुण, लोहारे येथील 72 वर्षीय ज्येष्ठासह 32 वर्षीय तरुण, सावरगाव घुले येथील 41 वर्षीय तरुण, घारगाव येथील 46 वर्षीय इसम,


घुलेवाडीतील 53, 48 व 38 वर्षीय महिलांसह 44, 43, 26, 22 व 18 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 36 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, निमगाव जाळीतील 30 वर्षीय महिला, कोळवाडा येथील 76 वर्षीय महिला, कासारा दुमाला येथील 31 वर्षीय महिला, पारेगाव गडाख येथील 53 वर्षीय इसम, निमगाव बु. येथील 25 वर्षीय तरुण, गोल्डनसिटीतील 41 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 41 वर्षीय तरुणासह 16 वर्षीय मुलगा व 15 वर्षीय मुलगी, साकूर येथील 45 वर्षीय महिला व 18 वर्षीय तरुण, सुकेवाडीतील 45 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 30 व 27 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी, पिंप्री लौकी येथील 28 वर्षीय तरुण, खंडेरायवाडी येथील 42 वर्षीय महिला, राजापूर येथील 52 वर्षीय महिला,


वडगाव लांडगा येथील 70 वर्षीय महिला व 35 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 35 वर्षीय तरुण, वेल्हाळे येथील 66 वर्षीय दोघी महिलांसह 40 व 26 वर्षीय तरुण आणि 11 व तीन वर्षीय बालके,हिवरगाव पावसा येथील 31 वर्षीय तरुण, शिरापूर येथील 45 वर्षीय इसम, डोळासणे येथील 30 वर्षीय तरुण, झोळे येथील 25 वर्षीय तरुण, चंदनापूरीतील 55 व 32 वर्षीय महिला आणि 38 व 30 वर्षीय तरुण, रणखांब येथील 40 वर्षीय महिला आणि कणकापूर येथील 50 वर्षीय इसम अशा तालुक्यातील एकूण 81 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. यासोबतच शिर्डी येथील 46 वर्षीय इसम, गणोरे येथील 73 व 32 वर्षीय महिला, कोपरगाव येथील 33 वर्षीय महिला, राहाता येथील 71 वर्षीय ज्येष्ठासह 30 वर्षीय तरुण, श्रीरामपूर येथील 30 वर्षीय तरुण व 47 वर्षीय इसमावर संगमनेरात उपचार सुरु आहेत. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आज पडलेल्या भरीमुळे तालुका आता 8 हजार 395 वर पोहोचला असून सक्रीय रुग्णांची संख्या आता 656 झाली आहे.


जिल्ह्यातील कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रविवारपासून जिल्ह्यात रात्री 8 ते सकाळी 7 या कालावधीसाठी लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाची प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी या आदेशाचा चांगला परिणाम दिसून आला असला तरीही त्यातून वाढलेला प्रादुर्भाव आटोक्यात येण्याची कोणतीही शक्यता वैद्यकीय जाणकार नाकारीत आहेत. जिल्ह्यात आढळणार्‍या रुग्णांची गती अशीच टिकून राहील्यास आसपासच्या जिल्ह्यांप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यालाही लॉकडाऊनचा सामना करावा लागेल असे काही जाणकारांचे मत आहे. त्यातच आता वाढलेला प्रादुर्भाव विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू नये यासाठी इयत्ता नववी व दहावीचे वर्ग वगळता जिल्ह्यातील सर्व शाळा उद्यापासून 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Visits: 149 Today: 2 Total: 1114028

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *