थोरात कारखान्याच्या मदतीने आढळाचे ओव्हरफ्लो पाणी चिकणीत

थोरात कारखान्याच्या मदतीने आढळाचे ओव्हरफ्लो पाणी चिकणीत
चिकणी, निमगाव भोजापूर, राजापूर, जवळेकडलग परिसराला फायदा
नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने इंद्रजीत थोरात, संतोष हासे यांच्या पाठपुराव्यातून आढळा नदीचे ओव्हरफ्लोचे पाणी सतराशे फूट लांब व दोनशे फूट व्यासाच्या पाईपलाइनद्वारे चिकणी परिसरातील रोहित ओढ्यात सोडण्यात आले आहे. यामुळे शेतकर्‍यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे.


चिकणी येथे या ओव्हरफ्लो पाणी सोडण्याचा शुभारंभ थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, जिल्हा परिषद सदस्य आर. एम. कातोरे, पंचायत समिती सदस्य विष्णूपंत रहाटळ, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, रोहिदास पवार, भारत वर्पे, सरपंच शिवाजी वर्पे, उपसरपंच गोरख वर्पे, दत्तात्रेय वर्पे, शिवाजी मुटकुळे, जलसंपदाचे उपविभागीय अधिकारी आर. एम. देशमुख, शाखा अभियंता रजनीकांत कवडे व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते.


सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी या परिसरासाठी अनेकदा आढळा नदीतील ओव्हरफ्लोचे पाणी रोहित ओढ्यात आणले होते. याच उपक्रमाचा आदर्श घेऊन मंत्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली इंद्रजीत थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून सुमारे सतराशे फूट लांब व व दोन फूट व्यासाच्या पाईपलाइनद्वारे पाणी ओढ्यात आणले आहे. यामुळे परिसरातील शेतीला मोठा फायदा होणार असून पाणी पातळीतही वाढ होणार आहे. प्रास्ताविक दूध संघाचे संचालक विलास वर्पे यांनी केले. स्वागत दत्तात्रेय वर्पे यांनी केले. पांडुरंग वर्पे यांनी सूत्रसंचालन केले आणि शिवाजी मुळकुटे यांनी आभार मानले.

Visits: 19 Today: 1 Total: 115607

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *