दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचला माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदेंनी केला खळबळजनक आरोप


नायक वृत्तसेवा, नगर
अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा आरोप केले आहेत. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी आरोप केले आहेत. दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमधून होणारे व्यवहार सर्व बेकायदेशीर असून त्यांच्याकडे येणारा पैसा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकार्‍यांचा असल्याचा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. भाऊसाहेब शिंदे यांनी दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोपही केला. मात्र, दीपाली सय्यद यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत.

अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपालांच्या हस्ते पुरस्काराही दिले होते. 50 लोकांना 50 हजारांचे चेक देण्यात आले होते. हे चेक बनावट असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. विशेष म्हणजे दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून सातशे ते आठशे कोटी रुपयांचा व्यवहार झाला हा सर्व पैसा आला कोठून याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबत असलेल्या संबंधांचे सर्व पुरावे आपण शासनाला आणि माध्यमांना देऊ, असं शिंदे यांनी सांगितले.

भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट दीपाली सय्यद यांचा होता असाही आरोप शिंदे यांनी केला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची हत्या घडवून आणण्याचा सय्यद यांचा कट असल्याची खबळजनक आरोपही शिंदे यांनी केला. अयोध्या दौर्‍यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद उचकावत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा आधार होता, असा आरोपही शिंदे यांनी केला.

आरोपांवर दीपाली सय्यद काय म्हणाल्या?
मी कोणी मोठी नाही की घोटाळे करु शकेन. मला त्या व्यक्तीवर काही बोलायचं नाही. पाकिस्तान दुबई कनेक्शन असल्याचा आरोप केलाय त्यावर काय बोलायचं, असा सवाल दीपाली सय्यद यांनी केला. दीपाली सय्यद नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होत्या.

Visits: 210 Today: 1 Total: 2296138

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *