नाताळ सुट्टीनिमित्त शिर्डीत साईभक्तांचा महापूर भक्तांच्या गर्दीने महामार्गावर वाहनांची कोंडी


नायक वृत्तसेवा, शिर्डी
नाताळ सुट्टीनिमित्त शिर्डीत लाखो भाविकांची अलोट गर्दी झाली. साईंच्या जयघोषाने अवघे साईनगर दुमदुमून गेले होते. तर साईभक्तांच्या गर्दीने महामार्गावर वाहनांची कोंडी झाली होती. संस्थान कर्मचारी व पोलीस यंत्रणेची मात्र नियोजन करताना मोठी दमछाक झाली.

12 x 10 cm.cdr

नाताळनिमित्त साईभक्तांची साई दर्शनासाठी मोठी गर्दी झाली. शहरातील प्रत्येक चौकाचौकात गल्लीमध्ये, दर्शनरांगेत भाविक मोठ्या संख्येने दिसून येत होते. शिर्डीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने साईबाबा मंदिर व परिसरात देणगीतून आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नवीन दर्शनरांग व साईबाबा रुग्णालयावरही आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

दरवर्षी नाताळ सुट्ट्यामध्ये शिर्डीला देश-विदेशातील साईभक्त मोठ्या संख्येने येतात. करोनानंतर यावर्षी साईभक्तांची मोठी गर्दी शिर्डीत झाली आहे. शाळांना नाताळाच्या सुट्ट्या तसेच शनिवार व रविवार ही सुट्टी जोडून आल्यामुळे शिर्डीत साईभक्तांची मोठी गर्दी झाली आहे. लाखो भक्तांच्या गर्दीने साईनगरी फुलून गेली आहे. नाताळ तसेच सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईभक्तांची प्रत्येक वर्षी शिर्डीला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल लॉज, विद्युत रोषणाईने फुलले आहे. साई संस्थान, पोलीस प्रशासन, शासकीय प्रशासन, एसटी महामंडळ, नगरपरिषद प्रशासन यांनीही गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियोजन केले आहे. गर्दी काळात साईभक्तांच्या आरोग्यासाठी उत्तम व्यवस्थाही करण्यात आली आहे.

मात्र, साई दर्शनासाठी येणार्‍या नागरिकांमुळे वाहनांचीही वर्दळ वाढली आहे. ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होताना दिसते. कोरोनाचा इतर देशात प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक साईभक्त पुन्हा मास्क वापरताना दिसत आहेत. शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने शनिशिंगणापूर येथील श्री शनेैश्वर डेकोरेटर्सचे गणेश शेटे यांनी श्री साईबाबा समाधी मंदिर, परिसर तसेच साईबाबा रुग्णालय येथेही आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. साई समर्थ इलेक्ट्रिकलचे सुनील बाराहाते यांनीही नवीन दर्शनरांग इमारत येथे विनामूल्य विद्युत रोषणाई केली आहे. साई संस्थानचे सर्व निवासस्थाने हाउसफुल होती. खासगी हॉटेल लॉजही भाविकांनी हाउसफुल झाले होते. रेल्वे, एसटी, खासगी बसेस, खासगी प्रवासी वाहनेही मोठ्या प्रमाणात येथे सुरू होती.

Visits: 178 Today: 1 Total: 1953114

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *