ख्रिस्त जयंती मानवाच्या जीवनात आनंद देणारा सण ः शिनगारे सर्वपंथीय चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ख्रिस्त जयंतीनिमित्त घरावरील लखलखणारा तारा, ख्रिसमस ट्री, चर्चमधील येशू जन्माचा देखावा, कॅरल सिंगिंग, केक व चॉकलेट खाऊ वाटणारा सांताक्लॉज असे सुंदर दृश्य सर्वच चर्चमध्ये पाहावयास मिळाले. ख्रिस्त जन्माच्या गीताद्वारे समाजात प्रेम, दया, शांतीचा संदेश देण्याबरोबरच मनुष्याच्या जीवनातील अंधकार नष्ट करून पृथ्वीवरील सर्व मानव जातीच्या जीवनात प्रकाशाचा अनोखा आनंद देणारा हा सण असल्याचा संदेश सेंट मेरी धर्मग्राम प्रमुख फादर सायमन शिनगारे यांनी दिला.

संगमनेरातील ज्ञानमाता विद्यालयाचे प्राचार्य जेम्स थोरात, आबा वाघमारे, संत इग्नाथी चर्चचे प्रमुख नेल्सन परेरा, प्रकाश शहाराव, मेथॉडिस्ट चर्चचे जॉर्ज चोपडे, बिलिव्हर्स चर्चचे ग्रेगरी केदारी, बेथेल वर्शीप सेंटरचे शिवाजी लांडगे, बापू शेळके, दीपक शेळके, अमोल साळवे, विजय दारोळे आदिंच्या चर्चमधून धार्मिक एकोपा, महामारी दूर व्हावी, राजकीय परिस्थितीमध्ये स्थिरता यावी म्हणून ख्रिस्त जयंतीनिमित्ताने आपल्या माणुसकीचा वर्षाव सत्कृत्याद्वारे दीनदुबळे व गरजवंतांसाठी व्हावा हा महत्त्वाचा संदेश देण्यात आला. तर सर्वपंथीय चर्चमध्ये धार्मिक विधी व विविध सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे ख्रिस्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येऊन ख्रिस्ती बांधवांबरोबरच माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी समस्त ख्रिस्ती बांधवांना नाताळाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी आशा ओहोळ, सुखदेव शेळके, कैलास भोसले, लाजारस केदारी, प्रा. बाबा खरात, ख्रिस्ती विकास परिषदेचे अध्यक्ष अनिल भोसले, प्रभाकर दुशिंग, अ‍ॅड. विजयानंद पगारे, संगीता बारसे, तेरेसा सोनवणे, सुनंदा गायकवाड, सुहास गायकवाड, सुनील खरात, संध्या शेळके, संजय कदम, सचिन मुन्तोडे, अनुप कदम, सत्यानंद कसाब, प्रवीण रोहम, अन्तुन घोडके, रत्नाकर पगारे, विनोद गायकवाड, प्रकाश भोसले आदिंसह मोठ्या संख्येने तालुक्यात ख्रिस्ती बांधवांनी नाताळ उत्साहात साजरा केला.

Visits: 233 Today: 1 Total: 1869667

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *