लव्ह जिहाद प्रकरणी लोणीमध्ये विविध संघटनांचा आक्रोश पोलीस ठाण्यावर काढला मोर्चा; आरोपीला फाशी देण्याची मागणी


नायक वृत्तसेवा, राहाता
मुंबईची तरुणी श्रद्धा वालकर हिचा दिल्ली येथे आफताब पूनावाला याने निर्घृण हत्या केली. या घटनेचा देशभरातून निषेश होत आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथेही विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि वारकरी संप्रदायाच्यावतीने शनिवारी (ता.26) पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला आणि निवेदनाद्वारे आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे.

श्रद्धा हिला आफताब पूनावाला याने प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची हत्या करुन मृतदेहाचे 35 तुकडे करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा देशभरातून निषेध होत असून अमानवीय कृत्याबद्दल नराधम आफताबला फाशी देण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवरच शनिवारी विश्व हिंदू परिषद बजरंग दल, वारकरी संप्रदाय आणि लोणी खुर्द-बुद्रुकमधील सर्व हिंदुत्ववादी संघटनाच्यावतीने लोणी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. यावेळी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, अण्णाभाऊ साठे की जय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, श्रद्धाला न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

तसेच अशा घटनांना घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी धर्मांतर बंदीचा कायदा त्वरीत करून लव्ह जिहाद प्रकारांवर बंदी आणावी, असे या निवेदनात नमूद केले आहे. सदर निवेदन सहायक पोलीस निरीक्षक समाधान पाटील यांनी स्वीकारले. याप्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे राधाकिसन आहेर, सागर राक्षे, बबन कोरडे, प्रसाद घोगरे, दुर्गावाहिनीच्या प्रमुख स्वप्नाली थेटे, रवींद्र आहेर, अर्जुन लहामगे, अमोल जगधने, शाहू आहेर, भारत महाराज, वारकरी संप्रदायाचे महाराष्ट्र प्रांत प्रतिनिधी वेणूनाथ महाराज विखे, विठ्ठल महाराज अभंग, पानसरे महाराज, प्रशांत घोगरे, किरण आहेर, भैय्या गोसावी, स्वप्नील वर्पे, दिलीप चव्हाण, अजय धनवटे, योगेश बोरूडे, रेवण मिसाळ आदी आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते.

Visits: 151 Today: 1 Total: 1780027

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *