अकलापूर येथील बर्डे कुटुंबियांचे अजित पवारांकडून सांत्वन आदिवासी विकास मंत्र्यांशी संपर्क करुन मदतीचे केले आवाहन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकलापूर (ता. संगमनेर) येथे येऊन विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या चार मुलांच्या आई-वडीलांचे सांत्वन केले. तर शबरी योजनेतून दोन घरकुल मंजूर करून देण्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तत्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या आहेत.

संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथे विजेचा धक्का बसून अनिकेत अरुण बर्डे, ओंकार अरुण बर्डे, दर्शन अजित बर्डे, विराज अजित बर्डे या चार मुलांचा दुर्दैवी मृत्यूची झाल्याची घटना घडली होती. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार, आमदार डॉ. किरण लहामटे यांनी सोमवारी (ता. 17) सकाळी अकलापूर येथे येऊन बर्डे कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यापूर्वी पवार यांनी दत्तात्रेय महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी ही घटना कशी घडली यासंदर्भात त्यांनी सर्व माहिती समजावून घेतली. त्याचबरोबर बर्डे कुटुंबियांना शबरी योजनेतून दोन घरकुलं मंजूर करून देण्यासंदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी लगेच मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबियांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकार्यांना दिल्या.

यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, महावितरणचे कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपकार्यकारी अभियंता श्री. पाटील, तहसीलदार अमोल निकम, गटविकास अधिकारी अनिल नागणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक अध्यक्ष कपील पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, माजी शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, माजी पंचायत समिती सदस्य संतोष शेळके, डॉ. दत्तात्रय हांडे, अकलापूरचे माजी उपसरपंच संतोष देवकर, विश्वस्त शिवाजी तळेकर, संपत आभाळे, आंबीखालसाचे सरपंच बाळासाहेब ढोले, विकास शेळके, सुहास वाळुंज, गौरव डोंगरे, अशोक वाघ, बाळासाहेब कुर्हाडे, रघुनाथ आभाळे, पांडुरंग कुरकुटे, घारगावचे माजी सरपंच सुरेश गाडेकर, हॉटेल लक्ष्मीचे मालक आमीर शेख, संदीप आभाळे, विशाल वाणी, मुन्ना शेख, बाळासाहेब कुरकुटे, दिनेश पावडे यांच्यासह आदी उपस्थित होते.
