गाळेधारकांच्या शास्ती करासह गाळाभाडे माफ करा! नेवासा नगरपंचायतच्या मुख्याधिकार्‍यांकडे ‘राष्ट्रवादी’ची मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासा नगरपंचायतमधील गाळेधारकांचे शास्ती कर व गाळाभाडे माफ करावे अशी मागणी गाळेधारक व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार यांनी नुकतीच मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात राजेंद्र पोतदार यांनी म्हटले की, सन 2020 ते 2022 या दोन वर्षात देशभरात कोरोना महामारीमुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते. नगरपंचायत शॉपिंग सेंटरमधील गाळेधारकांना सुध्दा याचा आर्थिक फटका बसला आहे. सहा महिने गाळे बंद ठेवून गाळेधारकांनी शासनाला सहकार्य केले. याचा प्रतिकूल परिणाम होवून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. त्यातच आधीच येथील बाजारपेठ आर्थिक मंदीच्या विळख्यात आहे. त्यात व्यापारी बांधवांनी कर्ज काढून कोरोना काळात कामगारांचे पगार केले. यामुळे व्यापारी आर्थिक तणावात असताना सध्या नगरपंचायतमार्फत सक्तीने कर वसुली करत आहे.

याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दखल घेऊन नगरपंचायत प्रशासनाला निवेदन दिले आहे. तत्काळ गाळेधारकांचे शास्ती कर व गाळाभाडे माफ करावे. अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेस नगरपंचायत समोर आंदोलन करेल असा इशारा दिला आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पोतदार, व्यापारी राजेंद्र पोतदार, प्रसाद पोतदार, संतोष चांदणे, रोहन पोतदार, सोनू खाजेकर, फिलीप वडांगळे, वरद पोतदार आदी उपस्थित होते.

Visits: 106 Today: 2 Total: 1107495

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *