तालुक्याने ओलांडले बाधितांचे 33 वे शतक..! शहरातील रुग्णसंख्या आज मात्र वाढली, तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही 51 रुग्णांची भर..

नायक वृत्तसेवा, संगमनेर

प्रती दिवस पन्नास अथवा पन्नासपेक्षा जास्त रुग्ण सापडण्याची तालुक्यातील शृंखला कायम असून आजही शहरातील सतरा जणांसह ग्रामीण भागातील 34 अशा एकूण 51 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येने 33 वे शतक ओलांडले असून तालुक्याची रुग्णसंख्या 3 हजार 347 वर पोहोचली आहे. आजच्या रुग्णसंख्यातून शहरातील संक्रमणात किंचित वाढ झाल्याचे दिसून आले असून यापूर्वी बाधित आढळलेल्या आँरेंज कॉर्नर परिसरातून पुन्हा तीन रुग्ण समोर आले आहेत. 

आज खासगी प्रयोगशाळेतून 14 तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून 37 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातून शहरातील आँरेंज कॉर्नर परिसरातील 54 वर्षीय 47 वर्षीय महिला व 25 वर्षीय तरुण, निर्मलनगर परिसरातून 43 वर्षीय तरुण, पद्मानगर परिसरातील 51 वर्षीय इसमासह 70 व 45 वर्षीय महिला व 16 वर्षीय तरुण, जनतानगर मधील 45 व 51 वर्षीय महिला, पावबाकी रोड परिसरातील 63 व 56 वर्षीय इसमासह 33 व 29 वर्षीय तरुण तसेच 42 वर्षीय महिला, मालदाड रोड परिसरातील 41 वर्षीय तरुण, कुरण रोड परिसरातील 63 वर्षीय महिला,

शहराप्रमाणेच तालुक्यातील पेमगिरी येथील 39 वर्षीय तरुण, निमगाव बुद्रुक येथील 28 व 24 वर्षीय तरुण, रायतेवाडी येथील 48 वर्षीय इसमासह समनापुर येथील 34, 33, 30 व 19 वर्षीय तरुण तसेच एक वर्षीय बालिका, गुंजाळवाडी येथील 75 व 36 वर्षीय महिलेसह 42 वर्षीय तरुण, 14 वर्षीय बालक व बारा वर्षीय बालिका, हिवरगाव पावसा येथील 25 वर्षीय तरुण, पोखरी हवेली येथील 52 वर्षीय इसम, पिंपळगाव कोंझिरा येथील 28 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 73 वर्षीय  ज्येष्ठ नागरिक  व  72 वर्षीय  ज्येष्ठ  महिलेसह 38 वर्षीय महिला व 13 वर्षीय बालिका, वडगाव पान येथील 55 वर्षीय इसम, मेंढवण येथील 28 वर्षीय महिला, प्रतापपूर येथील 36 वर्षीय तरुण, कोल्हेवाडी येथील 78 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निळवंडे येथील 30 व 27 वर्षीय तरुण,

अकलापुर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 51 वर्षीय महिला, आंबीदुमाला येथील 70 वर्षीय महिला, माळेगाव हवेली येथील 52 वर्षीय इसम, दरेवाडी येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड येथील 52 वर्षीय महिला व शिबलापूर येथील 50 वर्षीय इसमाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही 51 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याने बाधितांचे 33 वे शतक ओलांडून 3 हजार 347 रुग्णसंख्या गाठली आहे.

Visits: 248 Today: 1 Total: 1849900

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *