भाजपा राज्यकर्त्यांमुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे ः आ.डॉ.तांबे
भाजपा राज्यकर्त्यांमुळे देशाची वाटचाल हुकूमशाहीकडे ः आ.डॉ.तांबे
कृषी विधेयकांविरोधात संगमनेरात काँग्रेसचे तीव्र निदर्शन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोणत्याही चर्चेविना पास झालेले कृषी विधेयक हे शेतकीर्यांना पूर्णपणे उध्वस्त करणारे असून यामुळे शेतीमालाचा भाव हा उद्योजकांच्या मर्जीवर राहणार आहे. तसेच नव्या कामगार कायद्यामुळे कामगार रस्त्यावर येणार आहे. हाथरसची दुर्देवी घटना, राहुल गांधाींना धक्काबुक्की ही भाजपने देशात सुरू केलेली हुकूमशाही असल्याची टीका आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी केली असून नवे कृषी विधेयक व कामगार कायदा तातडीने मागे घ्यावा अशी मागणी केली आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त (ता.2) यशोधन कार्यालय येथे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन करुन संगमनेर तालुका काँग्रेसच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते नवीन नगर रस्ता येथे केंद्राच्या कृषी विधेयक धोरणाविरोधात निदर्शन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. समवेत शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, इंद्रजीत थोरात, प्रा.बाबा खरात, मीरा शेटे, सभापती सुनंदा जोर्वेकर, निशा कोकणे, शंकर खेमनर, निर्मला गुंजाळ, गणपत सांगळे, संतोष हासे, आर. एम. कातोरे, अजय फटांगरे, सीताराम राऊत, सुरेश झावरे, नवनाथ अरगडे, अॅड.त्र्यंबक गडाख, सोमेश्वर दिवटे, निखील पापडेजा, सुभाष सांगळे, अर्चना बालोडे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार डॉ.तांबे म्हणाले, मोदी व योगी सरकारच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये अराजकता वाढली आहे. गरीब वाल्मिकी समाजाच्या मुलीवर झालेला अत्याचार हा अत्यंत दुर्देवी असून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना झालेली धक्काबुक्की अत्यंत निंदनीय आहे. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कृषीप्रधान भारतात नव्या कृषी कायद्याने शेतकरी उध्वस्त होणार आहे. नव्या कामगार कायद्याने भांडवलदारांच्या ताब्यात पूर्णपणे कामगारांचे जीवन दिले आहे. केंद्राच्या या दोन्ही काळ्या कायद्याने शेतकरी व कामगार पूर्णपणे उध्वस्त होणार असल्याने ते कायदे तातडीने मागे घ्यावे. तसेच हाथरस घटनेतील आरोपींना तातडीने फाशी द्यावी. भाजपा सरकारने आता जाहिरातबाजी सोडून प्रत्यक्ष काम केले पाहिजे. देशात वाढलेली जातीय तेढ, असुरक्षितता हा अत्यंत चिंतेचा विषय असून प्रत्येक नागरिकाने केंद्राच्या चुकीच्या धोरणांबद्दल आवाज उठवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी संपत डोंगरे, आर. बी. रहाणे, चंद्रकांत कडलग, बाळासाहेब पवार, अभिजीत ढोले, किशोर टोकसे, शेखर सोसे, वंदना गुंजाळ, विलास कवडे, भास्कर शेरमाळे, साहेबराव गडाख, मीनानाथ वर्पे, शिवाजी गोसावी, ज्ञानेश्वर राक्षे, कचरु पवार, नवनाथ आंधळे, तात्या कुटे, सत्यजीत थोरात आदी उपस्थित होते. नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्वीकारले.