संगमनेरमध्ये सायक्लोथॉन फेरी उत्साहात संपन्न जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटलचा उपक्रम


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जागतिक हृदय दिन (ता.29) निमित्ताने संगमनेरातील मेडिकव्हर हॉस्पिटलच्यावतीने सायक्लोथॉन फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सुमारे अडीचशे ते तीनशे लोकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. उल्लेखनीय बाब म्हणजे तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

या सायक्लोथॉनची सुरुवात मेडिकव्हर हॉस्पिटल येथून सकाळी सात वाजता झाली. आपले हृदय आणि संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी सायकल प्रवास गरजेचा आह, असा संदेश यातून देण्यात आला. मेडिकव्हर हॉस्पिटल येथे सर्वांना टी-शर्ट आणि कॅपचे वाटप झाल्यावर हॉस्पिटलचे सेंटरहेड संजोय समांता यांनी सहभागी लोकांचे स्वागत करून हिरवा झेंडा दाखविला. अकोले नाक्यापासून, मेनरोड, दिल्ली नाका ते अमृतवाहिनी कॉलेजहून पुन्हा मेडिकव्हर हॉस्पिटल अशी फेरी झाली. यामध्ये खास आकर्षण स्पेनमध्ये आयर्न मॅन म्हणून गौरविलेले डॉ. संजय विखे ठरले. तसेच उद्योजक करण राजपाल आणि अमर नाईकवाडी, आयएमएचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र घुले, निमाचे अध्यक्ष डॉ. सुभाष मंडलिक, संगमनेर सायकल असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र गुंजाळ, रोटरी क्लब संगमनेरचे अध्यक्ष ऋषीकेश मोंढे, सचिव आनंद हासे हे सहभागी होते.

सायक्लोथॉन फेरीमध्ये सहभागी लोकांची हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी करण्यात आली. या फेरीत सहभाग घेतल्याबद्दल मेडिकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड संजोय समांता, डॉ. सुशांत गिते, डॉ. चेतन जैन, डॉ. संदीप बोरले, डॉ. प्रमोद गांगुर्डे, डॉ. शिवम गुप्ता, डॉ. कैलास मांडे, मार्केटिंग मॅनेजर दीपक जाधव, योगेश चौधरी, दीपक तुवर, सुशील टोकसे, चेतन ठाकूर, संजय व्यास, मुक्तार शेख, योगेश मुर्तडक, श्रीकृष्ण चंदनकर, संतोष गोडसे आदिंनी आभार मानले.

Visits: 82 Today: 1 Total: 1110267

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *