निळवंडेतून येणारे पाणी कोणीही रोखू शकणार नाही ः थोरात थोरात कारखान्याची 55 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मोठा संघर्ष करून भंडारदर्‍याचे हक्काचे 30 टक्के पाणी मिळवले. ओढ्या-नाल्यांवर बंधार्‍यांचे जाळे निर्माण केले. निळवंडे धरण व कालवे हे जीवनाचे ध्यासपर्व मानून धरण पूर्ण केले. कालव्यांसाठी सातत्याने मोठा निधी मिळवला. आता दोन्हीही कालव्यांची कामे ही अंतिम टप्प्यात आली असून या कालव्यातून येणारे पाणी आता कोणीही रोखू शकणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले असून आपण सत्तेचा उपयोग हा कायम चांगल्या कामासाठीच केला असल्याचे म्हटले आहे.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 55 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष प्रताप ओहोळ हे होते. तर व्यासपीठावर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. माधव कानवडे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे, कर्करोगतज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात, इंद्रजीत थोरात, लक्ष्मण कुटे, शंकर खेमनर, अमित पंडित, आर. बी. रहाणे, कारखान्याचे उपाध्यक्ष संतोष हासे, संपत डोंगरे, लहानू गुंजाळ, नवनाथ अरगडे, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग, मिलिंद कानवडे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आमदार थोरात म्हणाले, 1985 ला संगमनेर तालुक्यातील नेतृत्व संपवण्यासाठी काहींनी बाहेरचा उमेदवार लादला. मात्र जनतेच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवली आणि ही तालुक्याच्या विकासाला दिशा देणारी ठरली. सर्वप्रथम तालुक्यासाठी भंडारदर्‍याच्या हक्काचे पाणी मिळवले. ओढ्या-नाल्यांवर बंधार्‍यांचे जाळे निर्माण केले. त्यानंतर सातत्याने निळवंडे धरण व कालव्यांसाठी अविश्रांत काम केले. या धरणाच्या कामासाठी मागील काळातील सर्व मुख्यमंत्री यांचे मोठे योगदान राहिले आहेत. त्याचप्रमाणे माजी मंत्री मधुकर पिचड यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. ज्यांनी मदत केली त्यांची नावे घेतलीच पाहिजे. निळवंडे धरण आपल्या हातून होणे हे नियतीने ठरवले होते. 2014 ते 2019 च्या काळामध्ये कामे अत्यंत मंदावली होती. 2019 मध्ये पुन्हा सत्तेवर येताच 1200 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही मोलाचे सहकार्य मिळाले. येत्या दिवाळीमध्ये दोन्ही कालव्यांद्वारे पाणी आणणे हे आपले उद्दिष्ट होते. मात्र सत्ता बदल झाला तरी आता कोणी काहीही केले तरी निळवंडेच्या कालव्यांमधून येणारे पाणी कोणीही रोखू शकणार नाही.

कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले, मागील अहवाल सालात कारखान्याने 15 लाख 53 हजार मेट्रीक टन विक्रमी गाळप केले आहे. कारखान्याने 18 उपपदार्थांच्या माध्यमातून चांगले उत्पादन केले असून हा कारखाना इतरांसाठी आदर्शवत ठरला असल्याचे ते म्हणाले. यावेळी कारखान्याचे संचालक चंद्रकांत कडलग, गणपत सांगळे, रामदास वाघ, रमेश गुंजाळ, रोहिदास पवार, मीनानाथ वर्पे, इंद्रजीत खेमनर, संपत गोडगे, अभिजीत ढोले, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, विनोद हासे, अनिल काळे, माणिक यादव, मंदा वाघ, मीरा वर्पे, संभाजी वाकचौरे, सचिव किरण कानवडे, प्रा. बाबा खरात, शंकर ढमक, नवनाथ गडाख, अशोक मुटकुळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. या वार्षिक सर्वसाधारण सभेचे नोटीस वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. इतिवृत्त वाचन दत्तात्रय भवर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.


खबर्‍यांचा बंदोबस्त जनता करेल…
संगमनेर तालुका हा विकासातून वैभवाकडे वाटचाल करत आहेत. येथील सर्व सहकारी संस्था लौकिकास्पद काम करत आहेत. सत्तेचा उपयोग हा जनतेच्या विकासाकरीता व चांगल्या कामाकरीता केला आहे. कधीही सुडाचे राजकारण केले नाही. मात्र आता काहीजण त्रास देत आहेत. याकामी तालुक्यातून खबर देणार्‍यांचा जनताच बंदोबस्त करेल असेही आमदार थोरात यांनी सांगितले.

Visits: 5 Today: 3 Total: 30551

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *