रामवाडी शाळेला खरात कुटुंबियांची एक लाखाची मदत पंचशील सांस्कृतिक कलामंचचे केले शानदार लोकार्पण

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील रामवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लिंबाजी खरात यांनी आपले पिताश्री लिंबाजी विठ्ठल खरात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ जिल्हा परिषद शाळेला एक लाख रुपये किमतीचा पंचशील सांस्कृतिक कलामंच उभा करून दिला. सदर कलामंचचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला.

याप्रसंगी शाळेत राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मुख्याध्यापक केशव घुगे यांनी दिली. या शाळेत लोकसहभागातून आजपर्यंत शाळेचे रंगकाम, चित्रकाम, साउंड सिस्टीम, व्हाइट बोर्ड, वर्गात अभ्यासक्रमाचे फलक तसेच विविध कामे करण्यात आली आहेत. पालक सहभागातून मिष्टान्न भोजन हा शाळेचा उपक्रम गत चार वर्षांपासून नियमितपणे सुरू आहे. ग्रामपंचायतच्या माध्यमातून स्मार्ट टीव्ही, शाळेची पडवी, शालेय परिसरात ब्लॉक बसवणे, साउंड सिस्टीम अशी कामे पूर्णत्वास आली आहेत. चार वर्षांपासून विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती, मंथन व प्रज्ञाशोध परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवले आहे.

प्रकाश खरात यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंचशील सांस्कृतिक कलामंच ही शाळेला दिलेली अनमोल भेट असून सदर कलामंचामुळे शाळेच्या वैभवात भर पडली आहे. विद्यार्थ्यांचा ऊन, वारा, पाऊस यापासून बचाव होऊन विविध कार्यक्रम घेण्यासाठी हा कलामंच महत्वाचा ठरणार असल्याची माहिती संजय खरात यांनी दिली. यानिमित्ताने शाळेच्या व ग्रामस्थांच्यावतीने प्रकाश खरात यांचा प्रसंगी सत्कार करण्यात आला. शाळेला आवश्यक असणार्या भौतिक सुविधा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात येतील अशी ग्वाही प्रकाश खरात यांनी दिली. आगामी काळात ध्वजस्तंभ निर्मिती व कलामंचची मागील भिंत येत्या महिनाभरात लोकसहभागातून पूर्ण केली जाईल अशी ग्वाही ग्रामस्थांनी दिली.

अध्यक्षस्थान माजी सरपंच चंद्रभान खरात यांनी भूषविले. शाळेला मिळालेल्या या मदतीबद्दल केंद्रप्रमुख अशोक गोसावी, विस्ताराधिकारी दीपक त्रिभुवन, गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी ग्रामस्थ व शिक्षकांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमास व्यवस्थापन समिती अध्यक्षा रविना खरात, उपाध्यक्ष संतोष खरात, सदस्य संजय खरात, संदीप खरात, भागवत नागरे, मोहन खरात, सोसायटीचे संचालक मधुकर खरात, संतु खरात, बाबासाहेब खरात, सुखदेव खरात, साहेबराव खरात, मनोज खरात, दिलीप खरात, दत्तू खरात, योगेश खरात, फकिरा भालेराव, गोपीनाथ खरात, सोमनाथ खरात, दादा खरात, सुनील खरात, अनिल खरात, गणेश खरात, दौलत खरात, स्वप्नाली भालेराव, योगिता खरात, अंगणवाडी सेविका संगीता मुंतोडे आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन केशव घुगे यांनी केले तर आभारप्रदर्शन सुरेखा आंधळे यांनी केले.
