सलग दुसर्या दिवशी संगमनेरकरांना मोठा दिलासा! ग्रामीणभागातील संक्रमणाचा वेग मात्र कायम असल्याने तालुक्यातील चिंता कायम..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडचे संक्रमण आजही भरातच असून तालुक्यातील एकूण 168 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे संगमनेर तालुक्याची आरोग्य स्थिती अधिक चिंताजनक झाली असून ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या रुग्णांसाठी त्यांच्या नातेवाईकांची धावपळ वाढली आहे, त्यातच तालुक्यातील रेमडेसिवीर लशीचा पुरवठा अजूनही ‘काळा बाजार’ करणार्यांच्या हाती असल्याने सर्वसमान्यांची आर्थिक लुटही बिनबोभाटपणे सुरु आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील अवघ्या 31 जणांचा समावेश असल्याने शहरातील संक्रमणात होत असलेली सातत्यपूर्ण घट संगमनेरकरांना दिलासा देणारी ठरत आहे. सध्याच्या स्थितीत तालुक्यातील सक्रीय रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठल्याने तालुक्यातील सर्व कोविड आरोग्य केंद्र व खासगी रुग्णालये तुडूंब झाली आहेत. आजच्या रुग्णवाढीने तालुका आता 11 हजार 360 रुग्णसंख्येवर पोहोचला असून सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 636 झाली आहे. उपचार पूर्ण केल्याने आज तालुक्यातील 214 रुग्णांना घरीही सोडण्यात आले.
गेल्या 1 एप्रिलपासून जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील संक्रमणात मोठी वाढ झाली असून संगमनेर तालुक्यातील जवळपास 98 टक्के भागात कोविडचा प्रादुर्भाव पसरला आहे. रोजच्या मोठ्या रुग्णसंख्येने आरोग्य व्यवस्थेत संपन्न असलेल्या संगमनेर तालुक्याची अवस्थाही बिकट होत चालली असून रुग्णसंख्येत घट न झाल्यास परिस्थिती चिंताजनक अवस्थेत जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. अर्थात आज समोर आलेले रुग्ण आणि घरी सोडण्यात आलेले रुग्ण यात मोठी तफावत असल्याने त्यातूनही काहीसा दिलासा प्राप्त झाला आहे. आजही शहरी रुग्णसंख्येला लागलेली आहोटी कायम राहील्याने शहराला दिलासा तर ग्रामीणभागाच्या चिंता वाढल्या आहेत. आज तालुक्याच्या ग्रामीण क्षेत्रातून 133 रुग्ण समोर आले असून सर्वाधीक 26 रुग्ण घुलेवाडी परिसरातून तर 14 रुग्ण साकूर परिसरातून समोर आले आहेत.
आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील जनता नगरमधील 63, 43, 33 व 29 वर्षीय महिलांसह 28 व 16 वर्षीय तरुण, अकोले बायपास रस्त्यावरील 24 वर्षीय महिलेसह 17 वर्षीय तरुणी, मेनरोडवरील 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 28 वर्षीय तरुण, इंदिरानगर मधील 66 व 45 वर्षीय महिलांसह 51 वर्षीय इसम, मालदाड रोडवरील 54 वर्षीय इसमासह 26 व 16 वर्षीय तरुण, वडजे मळ्यातील 50 वर्षीय इसम, विद्यानगरमधील 41 वर्षीय दोघांसह 35 वर्षीय तरुण व 15 वर्षीय मुलगी, शिवाजी नगरमधील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय इसम, चैतन्य नगरमधील 78 वर्षीय महिलेसह 24 वर्षीय तरुण, चंद्रशेखर चौकातील 62 व 29 वर्षीय महिला, नवीन नगर रस्त्यावरील 49 वर्षीय महिला आणि संगमनेर असा पत्ता असलेले 85 व 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आणि 50 वर्षीय इसम.
ग्रामीणभागातील एकट्या घुलेवाडी येथून 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55, 53, 51 व 48 वर्षीय इसम, 43, 41, 36 वर्षीय दोघे, 28 वर्षीय दोघे, 23 व 19 वर्षीय तरुण, दहा वर्षीय मुलगा, 64, 59, 46, 44, 42, 36, 34 व 22 वर्षीय महिलांसह 13 व 16 वर्षीय मुली, 18 व 19 वर्षीय तरुणी, साकूर येथील 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 45 वर्षीय दोघे इसम, 32, 30, 25 व 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय दोन मुले आणि 40 व 34 वर्षीय महिलांसह 14 वर्षीय मुलगी, पिंपळगाव निपाणी येथील 30 वर्षीय महिला, जवळे बाळेश्वर येथील 33 वर्षीय तरुण, रणखांब येथील 32 वर्षीय महिलेसह 15 व 8 वर्षीय मुले, गुंजाळवाडीतील 46 व 28 वर्षीय महिला आणि 34 व 21 वर्षीय तरुण, देवगाव येथील 58 वर्षीय इसम, गोल्डन सिटीतील 47 वर्षीय इसम, सुकेवाडीतील 74 वर्षीय महिलेसह 57 वर्षीय इसम व 38 वर्षीय तरुण, हिवरगाव पावसा येथील 42 वर्षीय तरुण, निंबाळे येथील 29 वर्षीय महिला,
कासारा दुमाला येथील 85 वर्षीय वयोवृद्धासह 52 वर्षीय इसम आणि 80 व 65 वर्षीय महिला, जाखुरी येथील 21 वर्षीय तरुण, पिंपळगाव देपा येथील 67 वर्षीय महिला, उंबरी बाळापूर येथील 68 वर्षीय महिलेसह 53 वर्षीय इसम, 21 वर्षीय तरुण व 14 वर्षीय मुलगा, राजापूर येथील 84 वर्षीय वयोवृद्धासह 74 व 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आझमपूर येथील सात वर्षीय बालिका, चिंचोली गुरव येथील 39 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 57 वर्षीय इसमासह 30 वर्षीय महिला, घारगाव येथील 57 वर्षीय इसमासह 40 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 37 वर्षीय तरुण, कोठे खुर्द येथील 42 वर्षीय तरुण, ओझर बु. येथील 77 वर्षीय वयोवृद्ध इसम, कनोली येथील 72 वर्षीय महिलेसह 22 वर्षीय तरुण, शेडगाव येथील 38 वर्षीय तरुण, औरंगपूर येथील 53 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण व 28 वर्षीय महिला,
गोरक्षवाडी येथील दोन वर्षांची दोन बालके, मांडवे बु. येथील 10 वर्षीय मुलगा, निळवंडे येथील 41 वर्षीय तरुणासह 40 व 35 वर्षीय महिला, आंबी खालसा येथील 60 वर्षीय ज्येश्ठ नागरिक, वनकुटे येथील 32 वर्षीय तरुण, माळेगाव पठार येथील 45 वर्षीय इसमासह 27 वर्षीय तरुण व 21 वर्षीय महिला, आश्वी खुर्द मधील 27 वर्षीय तरुण, झरेकाठी येथील 47 वर्षीय इसम, मालुंजे येथील 82 वर्षीय वयोवृद्ध इसम, हंगेवाडी येथील 32 वर्षीय तरुण, शिबलापूर येथील 45 वर्षीय महिला, पिंपळे येथील 70 वर्षी ज्येष्ठ नागरिकासह 42 व 19 वर्षीय तरुण, जवळे कडलग येथील 26 वर्षीय तरुण, एठेवाडीतील 45 वर्षीय इसमासह 32 वर्षीय तरुण व 14 आणि 13 वर्षीय मुले, मालदाड येथील 65 वर्षीय महिला, पावबाकीतील 51 वर्षीय महिला, समनापूर येथील 39 वर्षीय महिला, शिंदोडी येथील 25 वर्षीय तरुण,
रायतेवाडीतील 39 वर्षीय महिला, वडझरीतील 25 वर्षीय महिला, वाघापूर येथील41 वर्षीय तरुण, निमोण मधील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 22 व 20 वर्षीय तरुण व 52, 45 व 27 वर्षीय महिला, पळसखेडे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 54 वर्षीय महिला व 27 वर्षीय तरुण, कर्हे येथील 45 वर्षीय इसम, माहुली येथील 15 वर्षीय मुलगा, तळेगाव दिघे येथील 60 वर्षीय महिला, 55 वर्षीय इसम व 10 वर्षीय मुलगा, लोहारे येथील 27 वर्षीय महिला व वडगाव पान येथील 44, 42 व 30 वर्षीय तरुण अशा संगमनेर तालुक्यातील एकूण 164 जणांसह अन्य तालुक्यातील 58 वर्षीय इसमासह 37, 30 व 29 वर्षीय तरुणांचा आजच्या बाधितांमध्ये समावेश आहे.
जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी तीन हजारांहून अधिक रुग्ण..!
आज शासकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेले 835, खासगी प्रयोगशाळेचे 525 व रॅपीड अँटीजेन चाचणीतील 1 हजार 696 निष्कर्षातून जिल्ह्यातील 3 हजार 56 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. यात आजवरचे सर्वाधीक 730 रुग्ण एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात आढळून आले असून त्या खालोखाल राहाता 285, नगर ग्रामीण 273, कर्जत 199, श्रीरामपूर 178, संगमनेर 168, कोपरगाव 166, नेवासा 155, शेवगाव 149, पाथर्डी 144, राहुरी 140, पारनेर 128, अकोले 115, भिंगार लष्करी परिसर 91, श्रीगोंदा 61, जामखेड 46 व इतर जिल्ह्यातील 28 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्येत आजही उच्चांकी भर पडल्याने रुग्णसंख्या आता 1 लाख 29 हजार 257 झाली आहे.