पाच नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या! आमदार आशुतोष काळे यांच्या अधिकार्‍यांना सूचना


नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील नागरिकांना लवकरात लवकर नियमित स्वच्छ पाणी मिळावे यासाठी 5 नंबर साठवण तलावाच्या कामाला गती द्या, अशा सूचना श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

131.24 कोटी रुपये निधीतून करण्यात येणार्‍या साठवण तलाव पाचचे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात आलेल्या कामाची नुकतीच आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत नुकतीच पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकार्‍यांकडून त्यांनी कामाची माहिती घेतली. यावेळी आमदार काळे म्हणाले, 5 नंबर साठवण तलावासाठी मंजूर करून आणलेल्या 131.24 कोटी निधीतील समावेश असलेल्या इतर कामांना प्रारंभ करण्यात आला आहे.

मात्र कामाला गती कमी आहे. त्यामुळे साठवण तलावाच्या पुढील कामाला देखील गती देण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकार्‍यांनी जातीने लक्ष द्यावे. अडचणी आल्यास माझ्याशी संपर्क करा. मात्र लवकरात लवकर मुदतीच्या आत 5 नंबर साठवण तलावाचे काम पूर्ण कसे होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करून साठवण तलावाच्या कामाला गती द्या, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. यावेळी तहसीलदार विजय बोरुडे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, नगरपरिषद अभियंता सुनील ताजणे, विवेक पाटील, पाटबंधारे विभागाचे मिसाळ, महेश मुंगेरीया, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे, धरमचंद बागरेचा, शहराध्यक्ष सुनील गंगुले, शहर कार्याध्यक्ष संतोष चवंडके आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Visits: 132 Today: 1 Total: 1103100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *