अकोले येथे कालभैरव जयंती दीपोत्सव साजरा

नायक वृत्तसेवा, अकोले
येथील पुरातन सिद्धेश्वर शिवालय परिसरातील काळभैरव देवस्थान मंदिरात कालभैरव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्तिक मास अष्टमीचे औचित्याने दीपोत्सव पार्श्वभूमीवर आकर्षक रोषणाईने परिसर उजळून निघाला होता.

विख्यात हार्मोनियम वादक मुकुंद पेटकर आणि त्यांच्या परिवाराच्या नियोजनाने भाविकांकडून मंदिरात आणि पुरातन पायर्‍यांवर बहुसंख्य पणत्यांची नयनसुखद, दैदीप्यमान रोषणाई, आकर्षक विशाल रांगोळी करण्यात आली होती. लोकदेवता आणि लोकसंस्कृतीचे अभ्यासक डॉ.सुनील शिंदे, कालभैरवाचे वैशिष्ट्य सांगताना म्हणाले, कालभैरव शक्तीपीठाचा रक्षक मानला जातो. शक्तीपीठांच्या ठिकाणी भैरवाचे अस्तित्व समजले जाते. अकोलेतील या मंदिरात भैरव आणि अंबिकेची मूर्ती प्रतिष्ठित आहे. काळभैरी, मार्तंड भैरव, रवळनाथ, मल्हारी अशीही अन्य नावे काळभैरवास आहेत. शेवटी सायंकाळी सामुदायिक कालभैरव अष्टक स्तोत्र पठणाने उपक्रमाची सांगता झाली.

Visits: 10 Today: 2 Total: 116243

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *