पाणी फाउंडेशनकडून ज्ञानदानाचे पवित्र कार्य ः डॉ. पोळ भोजदरीतील शेतकर्यांनी काढली मिरवणूक; शेतकर्यांनाही मार्गदर्शन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पाणी फाउंडेशनचे ग्रामीण भागात मोठे कार्य आहे. केवळ जलसंधारणच नव्हे तर ज्ञानदानाचे पवित्र कार्यही फाउंडेशन करत असल्याचे गौरवोद्गार फाउंडेशनचे प्रमुख मार्गदर्शक व सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. अविनाश पोळ यांनी काढले.
संगमनेर तालुक्यातील पाणी फाउंडेशन फार्मर कपमध्ये सहभागी झालेल्या खंदरमाळ गावाला डॉ. पोळ यांनी भेट देऊन शेतकरी गटांना मार्गदर्शन केले. त्यानंतर त्यांनी सोयाबीन शेतीस भेट दिली. तत्पूर्वी भोजदरीच्या शेतकर्यांनी डॉ. पोळ यांची गावातून ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या सर्वांना चांगले काम करायचे असून समाजाला बरोबर घेऊन जायचे आहे. त्याचबरोबर पाणी फाउंडेशन हे ज्ञान देण्याचे कामही करत असल्याचे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. त्यानंतर सोयाबीन संदर्भात शेतकर्यांचे प्रश्नही समजावून घेतले. याप्रसंगी पाणी फाउंडेशनचे समन्वयक राजेंद्र जाधव, सामाजिक कार्यकर्ते किशोर डोके, माजी उपसरपंच प्रमोद लेंडे, प्रगतिशील शेतकरी रवींद्र लेंडे, मंगेश साळगट, हरिभाऊ करंजेकर, राजेंद्र लेंडे, बंडा गाडेकर, बारकु वाघुले, दत्तात्रय लेंडे, काशिनाथ गाडेकर आदी शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, डॉ.अविनाश पोळ यांनी भोजदरी गावाला भेट दिली. तेथील शेतकरी गटाने त्यांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढली. या स्वागताने ते भारावून गेले. त्यानंतर त्यांनी शेतकरी गटांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच शिल्पा पोखरकर, गणपत हांडे, वसंत डोंगरे, विकास हांडे, शांताराम हांडे, सुनील लोहटे, अणाणासाहेब डोंगरे, विमल डोंगरे, मालती भारती यांसह शेतकरी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. याचबरोबर पिंपळगाव देपा, मोधळवाडी, सावरगाव तळ, पिंपळगाव माथा, पेमगिरी या गावांनाही त्यांनी भेटी देऊन शेतकरी गटांना मार्गदर्शन केले.