जुन्या पेन्शनसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे विखेंना निवेदन
जुन्या पेन्शनसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांचे विखेंना निवेदन
नायक वृत्तसेवा, राहाता
1 नोव्हेंबर, 2005 पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना जुनी पेन्शन मिळावी व 10 जुलैची अधिसूचना रद्द व्हावी. यासाठी जुनी पेन्शन कोअर कमिटीच्या शिष्टमंडळाने नुकतेच माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे व खासदार डॉ.सुजय विखे यांना निवेदन दिले.
राहाता, संगमनेर, कोपरगाव तालुका जुनी पेन्शन कोअर कमिटी व माध्यमिक शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने लोणी (राहाता) येथे जाऊन विखे यांच्याशी पेन्शनविषयी चर्चा केली. यावेळी माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव आप्पासाहेब शिंदे, प्रवरा शिक्षक पतसंस्थेचे सचिव एन.डी.विखे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे सचिव प्रा.दिलीप डोंगरे, राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त व जुनी पेन्शन कोअर कमिटीचे मुख्य संघटक अनिल लोखंडे, जुनी पेन्शन कोअर कमिटीचे मुख्य संघटक मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे, मुख्याध्यापक संजय लहारे, अहमदनगर क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सुनील गागरे, अर्जुन वाळके, नंदकुमार शितोळे, उमेश गुंजाळ, माधव थोरात, आप्पासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर रसाळ, श्री.गिरी, राजू भालेराव, राम गोडगे, दादासाहेब तुपे आदी शिक्षक उपस्थित होते. यावेळी माजी मंत्री विखे म्हणाले, जुनी पेन्शन हा विषय मला पूर्ण माहित आहे तुमच्यावर अन्याय झाला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये हा विषय मी मांडणार आहे व 10 जुलैची अधिसूचना रद्द होण्यासाठी तसेच 1 नोव्हेंबर, 2005 पूर्वीची पेन्शन तुम्हाला मिळावी त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे संदेश पाठविणार असल्याचे आश्वासन दिले.