तिघा भामट्यांनी ट्रकचालकाला सव्वा लाखाला लुटले

तिघा भामट्यांनी ट्रकचालकाला सव्वा लाखाला लुटले
नायक वृत्तसेवा, राहुरी
स्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या चालकाला तिघा भामट्यांनी चाकूचा धाक दाखवून 1 लाख 8 हजारांची रोकड व 5 हजारांचा मोबाइल लांबविला. नगर-मनमाड मार्गावरील राहुरी फॅक्टरीच्या गुंजाळ नाक्याजवळील इंडियन पेट्रोल पंपासमोर सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली.


सुनील शिरसाठ (कोल्हार खुर्द, तालुका राहुरी) हे ट्रकचालक वाहन थांबवून टायरमधील हवा चेक करत असताना दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांना चाकूचा धाक दाखवत रोकड व मोबाइल चोरून पोबारा केला. या घटनेची खबर मिळताच श्रीरामपूर विभागाचे पोलीस उपाधीक्षक राहुल मदने, राहुरीचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत राक्षे हे करत आहे.

Visits: 127 Today: 3 Total: 1112904

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *