तालुक्याने गाठले कोविड बाधितांचे बत्तीसावे शतक.. ! शहरातील तेरा जणांसह एकुण बासष्ट जणांना कोविडचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील कोविडची स्थिती दिवसोंदिवस अधिक गंभीर होत असून दररोज वाढणार्या मोठ्या रुग्णसंख्येने तालुक्यातील बाधितांचा आकडा फुगवला आहे. आजच्या स्थितीत शहरात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्या तरीही नागरिकांनी सतर्कता न बाळगल्यास आरोग्य व्यवस्थेवरील ताण वाढण्याची शक्यता निर्माण होऊ पहात आहे. आजही तालुक्याच्या रुग्णसंख्येत भर पडण्याचा सिलसिला कायम राहीला. त्यासोबतच आज पालिका कार्यालयातील 137 कर्मचार्यांचीही रॅपिड अँटीजेन चाचणी करण्यात आली. दिलासादायक बाब म्हणजे यातील एकाही अधिकारी अथवा कर्मचाऱ्याला कोविडची लागण झालेली नाही. आज खासगी प्रयोगशाळेसह अँटीजेन चाचणीच्या तपासणीतून शहरातील तेरा जणांसह एकुण 62 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले, त्यामुळे तालुक्याने 32 व्या शतकात प्रवेश करीत बरोबर 3 हजार 200 रुग्णसंख्या गाठली आहे.

गेल्या दोन दिवसांत तालुक्यातील रुग्णसंख्येत किंचितशी घट झाल्याने नागरिकांमध्ये काही अंशी समाधानाचे वातावरण होते. मात्र त्याचवेळी गेल्या शनिवारपासून आजवर चौघांचे बळीही गेल्याने या समाधानावर विरजन पडले आहे. त्यातच सोमवारी सुकेवाडीतील 27 वर्षीय पशूवैद्यकीय व्यवसायिकाचा बळी गेल्याने तालुक्यातील कोविडची दहशत कायम असल्याचे पुन्हा अधोरेखीत झाले आहे. सदर तरुणाने दोन वर्षांपूर्वीच आपला व्यवसाय थाटला होता, पशूधनाच्या सेवेतून समृद्धीची स्वप्ने पाहणार्या या तरुणावर कोविडची वक्रदृष्टी पडली आणि या महामारीने त्याच्या जीवनात कायमचाच अंधार केला.

आज खासगी प्रयोगशाळेकडून 25 जणांचे तर रॅपिड अँटीजेन चाचणीतून सदतीस जणांचे अहवाल पॉझिटिव आले. अँटीजेनप्रणालीद्वारा स्राव चाचणी करण्यासाठी 204 किटचा वापर करण्यात आला. त्यातून सदोतीस जणांचा निष्कर्ष सकारात्मक आल्याने त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. आज बाधित आढळलेल्यांंमध्ये शहरातील मालदाड रोड परिसरातील 32 वर्षीय तरुण, पावबाकी रोडवरील 48 वर्षीय महिलेसह 27 वर्षीय तरुण, देवाचा मळा परिसरातील 43 व 40 वर्षीय तरुण, साईनगर मधील 45 वर्षीय महिला, शिवाजीनगर परिसरातील 49 वर्षीय महिला, पंचायत समिती कार्यालयाच्या परिसरातील 45 वर्षीय महिला, अरगडे मळा परिसरातील 41 वर्षीय तरुण, इंदिरानगर परिसरातील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, बस स्थानक परिसरातील तीस वर्षीय तरुण व परदेशपूरा भागातील 28 वर्षीय तरुणासह शहरातील 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

त्यासोबतच आज ग्रामीण भागातील एकोणपन्नास जणांचे अहवालही पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात घुलेवाडी येथील 59 वर्षीय इसमासह 38, 30 व 25 वर्षीय तरुण, तसेच अकरा वर्षीय बालिका, गुंजाळवाडीतील 62 व 35 वर्षीय महिलेसह 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, 34 वर्षीय दोघे तरुण, समनापुर येथील 34 वर्षीय तरुण, निमगाव पागा येथील 64 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 43 व 38 वर्षीय महिला, तसेच 29, 16 व 15 वर्षीय तरुणी, धांदरफळ खुर्द येथील 25 वर्षीय महिला, संगमनेर खुर्द येथील 26 वर्षीय तरुण, घारगाव येथील 18 वर्षीय तरुण, कवठे बुद्रुक मधील 80 व 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 40 वर्षीय तरुण, 55, 35 व 33 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 12 वर्षीय बालिका, उंबरी बाळापूर येथील 16 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 45 वर्षीय महिला, चिंचपूर येथील 84 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 36 वर्षीय महिला,

मालदाड येथील 53 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 44 वर्षीय तरुण व 42 वर्षीय महिला, कोल्हेवाडी येथील 62 वर्षीय इसम, आंबी खालसा येथील बारा वर्षीय बालक, निमगाव जाळी येथील 51 वर्षीय इसम, निमगाव बुद्रुक येथील 28 वर्षीय तरुण, मांडवे बुद्रुक येथील 25 वर्षीय तरुण, खांजापुर येथील 49 वर्षीय इसमासह 38 व 22 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथील 79 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, म्हसवंडी येथील 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमोण येथील 55 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 58 वर्षीय इसम, कोळवाडे येथील 35 वर्षीय तरुण, निमज येथील 53 वर्षीय इसम व नांदुरी दुमाला येथील 40 वर्षीय तरुण अशा एकूण बासष्ट जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. एकूण रुग्णसंख्येत आजही भर पडल्याने तालुक्याच्या रुग्ण संख्येने बरोबर बत्तिसाव्या शतकाला स्पर्श करीत 3 हजार 200 बाधित संख्या गाठली आहे.

28 दिवसांतला अठरावा बळी!
या महिन्यात आत्तापर्यंत तालुक्याच्या रुग्णसंख्येत 1 हजार 418 रुग्णांची भर पडण्यासोबतच तालुक्यातील 18 जणांचे बळीही गेले आहेत. यात शहरीभागातील तिघांचा तर ग्रामीणभागातील 15 जणांचा समावेश आहे. गेल्या 1 सप्टेंबरपासून शहरातील माळीवाड्यातील 70 वर्षीय इसम, पंपींग स्टेशन परिसरातील 73 वर्षीय महिला व गांधी चौकातील 70 वर्षीय इसमाचा तर समनापूर येथील 62 वर्षीय इसम, मालदाड येथील 35 वर्षीय तरुण, चंदनापूरी येथील 74 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 39 वर्षीय इसम, चिखली येथील 76 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, हिवरगाव पठार येथील 70 व 55 वर्षीय इसम, वेल्हाळे येथील 65 वर्षीय इसम, मंगळापूर येथील 65 वर्षीय इसम, कौठे धांदरफळ येथील 55 वर्षीय इसम, मनोली येथील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, निमगाव बुद्रुक येथील 64 वर्षीय इसम व सायखिंडीतील 40 वर्षीय तरुण तर सुकेवाडीतील 27 वर्षीय पशूवैद्यकीय व्यावसायिकाचा समावेश आहे.

कोविडने घेतला सर्वाधीक कमी वयाचा जीव!
संगमनेर तालुक्याच्या कोविड इतिहासातील पहिल्या बळीची नोंद 7 मे रोजी धांदरफळ बुद्रुक येथील 68 वर्षीय इसमाच्या रुपाने झाली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने शहर व ग्रामीणभागातील बाधितांचे बळी जात राहीले. आजवर कोविडने बळी गेलेल्यांचे वयोमान पहाता बहुतेक मृतांचे वय पन्नास वर्षांहून अधिक आहे. आजवर बळी गेलेल्या एकुण 43 जणांमध्ये 24 जूनरोजी राजवाडा (संगमनेर) येथील 38 वर्षीय महिला, 19 जुलैरोजी शिबलापूर येथील 43 वर्षीय व 25 जुलैरोजी कुरण मधील 45 वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला होता. 31 ऑगस्टपर्यंतच्या एकुण 26 बळींमध्ये हे तिघे पन्नास वर्षांहून कमी वयाचे होते. तर याच महिन्यात 3 सप्टेंबररोजी मालदाड येथील 35 वर्षीय तरुण छायाचित्रकार, 5 सप्टेंबररोजी चंदनापूरी येथील 39 वर्षीय तरुण, 26 सप्टेंबररोजी सायखिंडी येथील 40 वर्षीय तर सोमवारी (ता.28) सुकेवाडीतील अवघ्या 27 वर्षांच्या तरुणाचा बळी घेत कोविडने आपली दहशत आजही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३८ हजार ३६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण आता ८८.५० टक्के झाले आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्याच्या रुग्णसंख्येत ७९० रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यात उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४ हजार २७८ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड स्राव तपासणी प्रयोगशाळेत १३४, खाजगी प्रयोगशाळेत २५० आणि रॅपिड अँटीजेन चाचणीत ४०६ रुग्ण बाधीत आढळले.

शासकीय प्रयोगशाळेच्या अहवालातून अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३२, अकोले ०१, कर्जत ०७, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण २२, पारनेर १०, पाथर्डी १०, राहुरी ०२, शेवगाव ०८, श्रीगोंदा १३, श्रीरामपूर १५, लष्करी क्षेत्र ०१, लष्करी रुग्णालय ११ आणि इतर जिल्ह्यातील ०१ तर
खाजगी प्रयोगशाळेच्या अहवालातून २५० जणांचे अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र ६९, अकोले ०२, जामखेड ०३, कर्जत ०४, कोपरगाव ०९, नगर ग्रामीण ३३, नेवासा १६, पारनेर ११, पाथर्डी १२, राहाता १७, राहुरी १६, शेवगाव १३, श्रीगोंदा ०४, श्रीरामपूर २४, लष्करी क्षेत्र ०७ येथील रुग्णांचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजेन चाचणीत आज ४०६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, अहमदनगर महापालिका क्षेत्र २३, अकोले ५१, जामखेड ३५, कर्जत ३४, कोपरगाव १३, नगर ग्रामीण ०१, नेवासा ३७, पारनेर ४१, पाथर्डी १७, राहाता ३४, राहुरी ३२, शेवगाव २६, श्रीगोंदा १४, श्रीरामपूर १५ आणि लष्करी परिसर ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

आज जिल्ह्यातील ८३४ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्र १७५, अकोले ३६, जामखेड ४१, कर्जत ३१, कोपरगाव ४४, नगर ग्रामीण ८७, नेवासा ३०, पारनेर ४०, पाथर्डी ६३, राहाता ६५, राहुरी ५६, संगमनेर ५३, शेवगाव २३, श्रीगोंदा ३७, श्रीरामपूर २६, लष्करी परिसर १३, लष्करी रुग्णालय १४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

- जिल्ह्यात बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या : ३८ हजार ३६५..
- जिल्ह्यात उपचार सुरू असलेले एकूण रूग्ण : ४ हजार २७८..
- जिल्ह्यातील आज वरचे एकूण मृत्यू : ७०६..
- जिल्ह्यातील एकूण रूग्ण संख्या : ४३ हजार ३४९..
- जिल्ह्यातील रुग्ण बरे होण्याचे सरासरी प्रमाण ८८.५० टक्के..
- जिल्ह्यात आज तब्बल ८३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर ७९० बाधितांची नव्याने भरही पडली..

