सावळीविहीरमध्ये 43 कोरोनाबाधित सापडले
सावळीविहीरमध्ये 43 कोरोनाबाधित सापडले
नायक वृत्तसेवा, राहाता
गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणता संक्रमण होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. राहाता तालुकाही याला अपवाद राहिला नाही. तालुक्यातील सावळीविहीर बुद्रूक गावात तब्बल 43 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
आरोग्यसेवक पैठणे यांनी सिद्धार्थनगरमधील दहा जणांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली असता पैकी तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच एका आरोग्य विभागातील महिलेलाही कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी (ता.24) राहाता बाजार समितीचे संचालक बाळासाहेब जपे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच संतोष आगलावे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रशेखर जपे, कर्मचारी नाना पवार यांनी वाडी-वस्त्यांवर जाऊन जंतूनाशक फवारणी केली. सदस्य जपे यांनी विना मोबदला टॅ्रक्टर दिला होता. तर ग्रामविकास अधिकारी रावसाहेब खर्डे वारंवार नागरिकांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत आहेत.