नपावाडी येथे मळणी यंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू

नपावाडी येथे मळणी यंत्रात अडकून तरुणाचा मृत्यू
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरालगत असलेल्या नपावाडी रस्त्यालगत सोयाबीन मळणी यंत्रामध्ये ओढल्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता.28) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. अशोक कोंडाजी पोकळे (वय 35) असे मयत तरुणाचे नाव आहे.


याबाबतची अधिक माहिती अशी की, मयत अशोक पोकळे हा आपल्या चार भावांसोबत नपावाडी रस्त्यालगत मळणी यंत्रातून सोयाबीन काढण्याचे काम करत असताना हाताला बांधलेले कापड यंत्रामध्ये ओढले गेल्याने डोक्यापासून कंबरेपर्यंत त्याच्या संपूर्ण शरीराचा चेंदामेंदा झाल्याने तो जागीच गतप्राण झाला. तातडीने यंत्र बंद करुन त्याला बाहेर काढण्यात आले. या घटनेची माहिती तातडीने राहाता पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा करुन मयत तरुणाच्या शरीराचे तुकडे पोत्यात भरुन शवविच्छेदनासाठी नेले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मयत तरुण पोकळेचे कुटुंबीय अत्यंत गरीब असून दिवसरात्र काबाडकष्ट करुन आपली उपजीविका करत आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Visits: 215 Today: 1 Total: 2125271

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *