दुर्वे प्रतिष्ठानच्या वकृत्व स्पर्धेने माणूसपण घडविले ः डॉ. मुटकुळे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा काशेश्वर विद्यालयात संपन्न
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑनलाइनच्या काळात भाषण कला टिकविण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. साथी भास्करराव दुर्वे प्रतिष्ठानची वक्तृत्व स्पर्धा माणूसपणं घडवण्याचे काम करते, असे विचार रंगकर्मी डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी व्यक्त केले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने साथी भास्करराव दुर्वे स्मारक प्रतिष्ठान संगमनेर आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा काशेश्वर विद्यालय कासारा दुमाला येथे नुकतीच संपन्न झाली. यावेळी विचारपिठावर राष्ट्रसेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, लोकपंचायत संस्थेचे सारंग पांडे, प्रा. जयसिंग सहाणे, मुख्याध्यापक भाऊसाहेब शिंदे, बी. के. गायकवाड, प्रकल्प प्रमुख नम्रता पवार आदी उपस्थित होते.
वाचनाकडून भाषणाकडे जाणारी ही स्पर्धा 38 वर्षांपासून अविरत सुरू असून यातून अनेक विद्यार्थी उपक्रमशील शिक्षक व सुजान कार्यकर्ते घडले आहेत. याप्रसंगी सारंग पांडे, परीक्षक अविनाश उगले, सुनंदा कानवडे, अॅड. राजू खरे यांनी स्पर्धेविषयी आपले अनुभव विशद केले. या स्पर्धेत तिसरी ते चौथी गटातून उन्नती कोल्हे प्रथम, तृप्ती हासे द्वितीय, दक्ष खरात तृतीय, स्वराली धनेश्वर चतुर्थ, आराध्या गिते पंचम, पाचवी ते सातवी गटातून मीरा गडाख प्रथम, प्राविण्य गोपाळे द्वितीय, समृद्धी थिटमे तृतीय, कृष्णा दिघे चतुर्थ, ज्ञानेश्वरी गायकर पंचम, आठवी ते दहावी गटातून प्रज्योत शेळके प्रथम, जान्हवी घुले द्वितीय, सत्यजीत खतोडे तृतीय, श्रावणी कोटकर चतुर्थ, पाकीजा शेख पंचम, अकरावी ते बारावी गटातून आकांक्षा पवार प्रथम, अर्पिता राणे द्वितीय, श्रद्धा गायकवाड तृतीय, उत्कर्षा कोल्हे चतुर्थ, संज्योत जाधव पंचम यांनी पटकावले आहेत. या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 165 विद्यार्थी सहभागी झाले होते. विजेत्या स्पर्धकांना दहा हजारांची दर्जेदार पुस्तके, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले. स्पर्धा संयोजनासाठी रजत अवसक, सुदर्शन शिंदे, कामाक्षा मुंडे, सुरेखा उबाळे, राजेंद्र क्षेत्रे, सुनीता पगडाल, प्रांजली मेखडंबर, अर्जुन वाळके यांनी विशेष परिश्रम घेतले होते. सूत्रसंचालन सुखदेव इल्हे, राहुल लामखडे यांनी केले. तर आभार सदानंद डोंगरे यांनी मांडले.