श्रीरामपूरमध्ये सोमवारी 73 कोरोनाबाधित सापडले
श्रीरामपूरमध्ये सोमवारी 73 कोरोनाबाधित सापडले
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
तालुक्यात सोमवारी (ता.28) नव्याने 73 जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे कोरोनाबाधितांचा आकडा 2196 वर जाऊन पोहोचला आहे. तर एका तरुण व्यापार्याचा मृत्यू झाल्याने बळी गेलेल्यांची संख्या 39 झाली आहे.
श्रीरामपूरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहातील कोविड सेंटरमध्ये सोमवारी रॅपिड अँटीजेन टेस्ट 70 व घशाचे स्त्राव 31 अशा तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये 30 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या चाचणीत 1, रॅपिड टेस्टमध्ये 30 तर खासगी प्रयोगशाळेत 12 असे एकूण 73 रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, 42 रुग्णांना यशस्वी उपचारांती कोविड सेंटरमधून सुट्टी देण्यात आली आहे. तर 40 नव्या सक्रिय रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तालुक्यात आत्तापर्यंत 4887 व्यक्तींची रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात आली असून 2196 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोमवारच्या चाचणीत प्रभाग एकमध्ये 8, श्रीरामपूर 3, बेलापूर 1, मांडवे 2, कान्हेगाव 1, खंडाळा 7, दत्तनगर 3, हरेगाव 1 तर गोंडेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आठ रुग्णांना अन्य रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले आहे.