जनार्दन आहेरांच्या कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार : आ. शिंदे घारगाव येथील सामूदायिक विवाह सोहळा ठरला लक्षवेधी

नायक वृत्तसेवा, संगमनेर
ज्यावेळेला आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटू त्यावेळी संगमनेर शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर व त्यांच्या प्रतिष्ठानने आयोजित केलेला भव्य-दिव्य सामूदायिक विवाह सोहळ्याची माहिती त्यांना देवू, असे गौरवोद्गार वरळी मुंबई विधान परिषदेचे आमदार सुनील शिंदे यांनी काढले.

संगमनेर तालुक्यातील घारगाव येथील व शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर यांनी शिवसंपर्क अभियान टप्पा दोननिमित्त कै. म्हतारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठानने मोफत आंबीखालसा येथील लक्ष्मी मंगल कार्यालयात सामूदायिक विवाह सोहळा आयोजित केला होता. याप्रसंगी वधू-वरांना आशीर्वाद देताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महिला जिल्हा संपर्कप्रमुख सुरेखा गव्हाणे, लक्ष्मी टेड्रींग कंपनीचे संचालक व उद्योजक बाळासाहेब गाडेकर, दिलीप साळगट, युवासेनेचे अमोल कवडे, गुलाब भोसले, दूध संघाचे माजी उपाध्यक्ष सुभाष आहेर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रमेश आहेर, सावता महाराज पतसंस्थेचे अध्यक्ष शांताराम गाडेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या ललीताताई आहेर, घारगावच्या सरपंच अर्चना आहेर, अशोक वाघ, अशोक गाडेकर, व्यापारी दिलीप आहेर, अनिल डोके, रणजीत ढेरंगे, संदीप रहाणे, माजी उपसरपंच सुरेश आहेर, दादापाटील आहेर, किसन दशरथ आहेर, तान्हाजी आहेर, बाळासाहेब शेळके, नितीन आहेर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले, सामूदायिक विवाह सोहळा हे मुंबई शहरामध्ये आम्ही फक्त पेपर किंवा टीव्हीच्या माध्यमातून पाहत होतो. माझ्या मतदारसंघात फार मोठी वस्ती आहे, त्यांनी माझ्याकडे विवाह सोहळा पार पाडण्यासाठी मोठा खर्च येत असतो असे सांगितले होते. त्यामुळे आपणही सामूदायिक विवाह सोहळ्याची चळवळ सुरू करावी असे त्यांनी मला सांगितले होते. त्यामुळे मी त्याठिकाणी सामूदायिक विवाह सोहळ्याला हातभार लावला होता. त्यानंतर माझ्या आयुष्यातील पुन्हा दुसर्‍यांदा सामूदायिक विवाह सोहळा पाहण्याचे भाग्य मला या सामूदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून मिळाले आहे. जनार्दन आहेर सारखे अनेक शिवसैनिक अशा चांगल्या कार्यक्रमला वाहून घेतात, त्यामुळे जनार्दन आहेर आपण खर्‍या अर्थाने पुण्याईचे काम करत असून तुमचे राजकीय भाग्य फार मोठे आहे. आपल्याला नक्कीच लोकांचे आशीर्वाद मिळतील आणि आमच्या सारखी माणसं तुमच्या कार्याचे नेहमीच कौतुक करतील.

तालुकाप्रमुख जनार्दन आहेर हे सामूदायिक विवाह सोहळा दरवर्षी साजरा करत असतात. अत्यंत चांगलं काम ते करत आहे. त्यांच्याबरोबर अख्खी पंचक्रोशीसह तालुका देखील आहे. आहे सर्व पक्षांचे व जातीधर्माचे लोक सहभागी आहे. त्यामुळे भविष्यात ही सामूदायिक विवाह सोहळ्याची चळवळ न थांबता आयुष्यभर ही चळवळ अशी सुरू ठेवावी, असे आवाहन जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी केले. सूत्रसंचालन विलास शेळके व सतीश खरात यांनी केले. हा सामूदायिक विवाह सोहळा पार पडण्यासाठी संतोष गाडेकर, रमेश उर्फ आबा आहेर, निलेश अशोक आहेर, संकेत गाडेकर, दत्ता आहेर, सचिन आहेर, किरण गाडेकर, वाल्मिक आहेर, अमोल खोंड, गोरक्ष पिसाळ, पप्पू उर्फ महेश आहेर, सतीश धात्रक, रवींद्र काशिद, मयुर आहेर, श्रीकांत कडाळे, मंगेश भुतांबरे, हनुमंता आहेर यांच्यासह कै. म्हातारबा लक्ष्मण आहेर प्रतिष्ठान घारगाव, समस्त पठारभाग ग्रामस्थ, व्यापारी मित्रमंडळ घारगाव व श्री संभाजी क्रिकेट क्लब घारगाव यांनी परिश्रम घेतले.

Visits: 21 Today: 1 Total: 121463

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *