गोवंश जनावरांची वाहतूक करणारा पिकअप पकडला

नायक वृत्तसेवा, घारगाव
कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने चारा व पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता गोवंश जनावरांची वाहतूक करणारा पिकअप घारगाव पोलिसांनी पठारभागावरील गुंजाळवाडी शिवारात मंगळवारी (ता.11) सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी 3 लाख 53 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुफियान निसार अन्सारी (रा.मदिनानगर, संगमनेर) हा पिंपळगाव देपा येथून पिकअपमधून (क्र.एमएच.14, सीपी.3378) एक बैल व सहा वासरांना लाला हाजी कुरेशी याच्या सांगण्यावरून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतने चारा व पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता वाहतूक करत असल्याची माहिती गुप्त खबर्‍यामार्फत पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांना समजली. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक धिरज राऊत, मुख्य हवालदार आदिनाथ गांधले, किशोर लाड व चालक नामदेव बिरे यांनी वरील ठिकाणी जावून हा पिकअप पकडला. याप्रकरणी पोलीस शिपाई किशोर लाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध गुन्हा नोंद क्रमांक 106/2021 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा 1976 सुधारित कायदा 1995 चे कलम 5 (अ) (ब) व पशु क्रूरता अधिनियम 1995 चे कलम 11 (अ) (ड) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मुख्य हवालदार आदिनाथ गांधले हे करत आहे.

Visits: 104 Today: 1 Total: 1109535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *