कोपरगाव शहर पोलिसांनी दुचाकी चोरणारी टोळी पकडली 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 20 दुचाकी केल्या जप्त

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
मोटारसायकल चोरी करणार्‍या तिघांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 20 दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. गोविंद संजय शिंदे (रा. बेट कोपरगाव), आशिष राममिलन कोहरी (रा. पुणतांबा चौफुली, कोपरगाव, मूळ रा. अमेठी, उत्तर प्रदेश) या दोघांना अटक करण्यात आली. तिसरा साथीदार नाना पानसरे हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.

19 मे रोजी बेट भागातून किशोर दिघे यांची दुचाकी चोरीला गेली होती. यार चोरी प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आर. पी. पुंड, जे. पी. तमनर, संभाजी शिंदे, राम खारतोडे, जी. व्ही. काकडे यांचे एक पथक तयार करून नाकाबंदी करत होते. गोविंद संजय शिंदे याच्याकडे चोरीची दुचाकी असून तो बेटनाका येथे थांबलेला आहे, असे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत समजले. मिळालेल्या माहितीच्या आधारे चौकशी केली असता आरोपी शिंदे उडवाउडवीचे उत्तर देऊ लागला.

दरम्यान, पोलिसांना संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन मोटरसायकलबाबत विचारपूस केली. त्याने आणखी दोघांची नावे सांगून मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल केले. दोन्ही आरोपींनी विविध ठिकाणाहून मोटारसायकल 20 मोटारसायकल पोलिसांकडे सुपूर्द केल्या. पोलिसांनी एकूण 8 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या मोटारसायकल ताब्यात घेतल्या आहेत.

Visits: 239 Today: 2 Total: 2121322

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *